मध्य प्रदेशच्या मुकुंद देव यांनी सजवली सांगितिक मैफल
पनवेल : कैलाश पर्वत हलवून टाकणारी तानसेनची शिवशंकरावरील रचना, गायकीचे स्मरण करून देणारी सांगितिक मैफिल काल, मंगळवारी (दि. 29) रंगली होती. पनवेलचा महागणपतीने, चिडीच्या पायाला दोर बांधून अलगद खेचून आणावे, तसे मध्य प्रदेशहून मुकुंद देव यांना खेचून आणले होते.
मेघ गर्जना सुरू होती, त्या अनुषंगाने देव यांनी मल्हार सूर आळविला. महागणपती चरणी सूर, स्वर, ताल यांची गट्टी जमली होती. मुकुंद देव यांनी शास्त्रीय संगीतातून वरूणराजालाही खुश केले. मल्हार सुरांची लयलूट त्यांनी केली. मल्हार, मालकोस, सोहीनी आणि आडाना हे सूर तर चौताल, आदी, सुलताल अशा तालांची मैफिल सजली होती.
गणपती वंदना, संत तुळशीदासाच्या दुर्लभ रचना,तानसेन यांनी पाच हजार वर्षांपूर्वी गायलेली धुर्पद मुकुंद देव यांनी सादर केली. शास्त्रीय संगीताची मेजवानी आयोजित केल्याबद्द्ल कांतीलाल प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे. उत्कृष्ट भजनसंध्या, साडे तीन शक्ती पीठांचे मातृपीठ आणि अष्टभुजा भगवती स्वरूप महागणपती, तुळजाभवानी, महालक्ष्मी,.रेणुकादेवी आणि सप्तशृंगी देवी थाटात विराजमान झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन हॉस्पिटलसमोरील नूतन गुजराथी शाळेच्या मैदानावर भक्ती, शक्तीचा संगम जुळून आला आहे.
आवन कहे गये, ही बंदिश भक्तीची द्वारे खुली करून गेली. चार पुरुषार्थ आणि भक्ती हे पाचवे पीठ किंवा पुरुषार्थ संत ज्ञानेश्वर माऊलीने मानले आहे. त्या भक्तीची दीक्षा देणारी तानसेन, तुळशीदास यांच्या रचना मुकुंद देव यांनी पेश करून महागणपतीच्या चरणी पाचवे पुष्प अर्पण केले.
पखवाजवर राम काठे (नितळस ) यांनी साथ दिली. गुरुनाथ महाराज काठे, मारुती महाराज भोपी, श्याम काठे, उल्हास भोपी आदी भजनातदंग झाले होते.
नैसर्गिक आपत्तीतून संरक्षण होण्यासाठी महागणपती चरणी विशेष पूजा महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून काल सायंकाळी वरूणराजाला शांत करण्यासाठी विशेषत: आवाहन करणारी वेदोक्त पध्दतीने मंत्रोच्चार सुरू ठेवण्यात आले होते. पनवेल, मुंबई, कोकणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून महागणपतीला मंत्रोच्चार, वेद रचनेतून साकडे घालण्यात आले होते.