स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मुंबई विद्यापिठाकडून पदवी परिक्षेचे निकाल अद्यापि लागलेले नाहीत. त्यामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीपैकी पदवीच्या शिष्यवृत्तीविषयी धोरण महापालिका प्रशासनाने शिथील करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडर केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या योजना विभागाच्या माध्यमातून पहिली ते पदवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यंदा पदवी परिक्षा निकालाबाबत मुंबई विद्यापिठाचा सुरू असलेला सावळागोंधळ जगजाहिर आहे. निकाल कधी मिळणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीमध्ये पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीचा निकालच लागला नसल्याने संबंधित विद्यार्थी पालिकेच्या शिष्यवृत्तीला मुकण्याची चिंता निखिल रतन मांडवे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या योजना विभागाकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीचीही अंतिम मुदत शिथिल करण्यात यावी. पदवी परिक्षेचा निकाल लागल्यावर किमान दहा दिवसाचा अवधी पदवी परिक्षा उत्तीर्ण देण्यात यावा, जेणेकरून संबंधित विद्यार्थ्यांनाही या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. महापालिकेने याविषयीचे धोरण व शिष्यवृत्तीमध्ये पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात आलेली मुदतवाढ लवकरात लवकर जाहिर करण्याची मागणी निखिल रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.