स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे राज्यभर कौतुक:व्टिटर,फेसबुकवर बोलबाला
मुंबई – परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवानचा आनंद घेता यावा आणि त्या निमीत्ताने भारतीय संस्कृतीचे दर्शन व प्रसार विदेशात देखील व्हावे म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईतील यंदाचा गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅडींग करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला, जगातील 45 देशातील प्रतिनिधी मुंबईतील या गणेशोत्सवासाठी आले होते, यात थायलंड, सिंगापूर, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी, श्रीलंका, नार्वे,अमेरिका, अशा विविध देशातील पर्यटकांचा समावेश होता. थायलंड आणि रशिया या दोन्ही देशांचे मोठे शिष्टमंडळ यात सहभागी झाले होते.या सर्व विदेशी पर्यटकांनी गणेशाची सामुहिक आरती केली त्यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील जनता भावूक झाली.या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याकरीता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांच्या पर्यटन विभागातील अधिका-यांनी मोठे परीश्रम घेतले. त्यामुळे राज्यभरात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे कौतुक होत असून राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी देखील ना.रावल यांचे अभिनंदन केले आहे. व्टिटर आणि फेसबुकवर देखील परदेशी पर्यटकांसाठी गणेशोत्सवाचा बोलबोला दिसून आला. यंदाच्या गणेशोत्सवात विदेशी पर्यटकांनी सहभाग घेवून त्यांचा आनंद घेत गणेशाची आरती केली हा मोठा चर्चेचा मुददा बनला.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेनुसार इतिहासात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला. भारतीय संस्कृतीचे ख-या अर्थाने दर्शन यानिमीत्ताने जगासमोर गेले, गणेशोत्सवामुळे सामाजिक एकता निर्माण होते हे जगातील पर्यटकांना आपल्या कल्पकतेने दाखवून देण्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यशस्वी झाले आहेत. यावेळी पुढील काळात देखील आंतरराष्ट्रीय ब्रॅडींग करण्याचा मानस मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभिनंदन केले. दरम्यान, विदेशी पर्यटकांनी घेतलेल्या आनंदाचा व्टिटर आणि फेसबुक या सोशल साईटवर देखील बोलबाला दिसून आला.