स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५
डोळ्याने पाहतो तेच सत्य :- लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई : डोळ्यांमुळेच जीवन सार्थकी लागते. कानाने कितीही कांही ऐकले तरी डोळ्याने पाहिल्याशिवाय समाधान होत नसते. म्हणूनच डोळ्याने पाहतो तेच सत्य असते. डोळ्यात जादू भरण्याचे काम लक्ष्मी आय बँक करीत आहे.त्यामुळेच मी आज नेत्रदानाचा संकल्प करीत आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये केले. गुरुवारी (दिनांक ७ सप्टेंबर) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नेत्रदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रोटरी क्लबचे अभिनंदन करीत मीसुद्धा रोटेरिअन असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे असेही ते यावेळी म्हणाले.
लक्ष्मी आय बँक,रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ झोन १ मधील १३ क्लब्स आणि ‘द डिव्हाईन म्युझिक अनलिमिटेड’ यांच्यातर्फे पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दिनांक ७ सप्टेंबर) नेत्रदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त ‘आंखों आंखों मे ‘ या संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर,पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल भगत हेसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.
लक्ष्मी आय इन्स्टिटयूटचे प्रमुख रोटेरिअन डॉ सुहास हळदीपूरकर,माजी प्रांतपाल दीपक पुरोहित,नियोजित प्रांतपाल डॉ शैलेश पालेकर,मेडिकल सर्व्हिस डायरेक्टर डॉ अनिल परमार या प्रमुख मान्यवरांसह सहयोगी १२ रोटरी क्लब्सचे प्रेसिडेंट अनुक्रमे रोटेरिअन सूर्यकांत कुल्ले,मदन बडगुजर,डॉ प्रमोद गांधी,विलास कावनपुरे,नीरज कोठारी,गणेश हांडे,डॉ लक्ष्मण आवटे,पुष्कराज मेंडन,सोपान जाचक,दीपक चौधरी,वृंदा धामणसकर आणि वसुधा पितळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले कि, संपूर्ण देशात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे काम चालू आहे. डोळे आहेत त्या जीवनाचे सार्थक आहे. कान आणि डोळे यामध्ये चार बोटांचे अंतर असते. कानाने कितीही कांही ऐकले तरी डोळ्याने पाहिल्याशिवाय समाधान होत नसते. म्हणूनच डोळ्याने पाहतो तेच सत्य असते. डोळे दान करण्यापेक्षा डोळ्यात जादू भरणे गरजेचे असते. माझ्याही डोळ्यात जादू भरण्याचे काम डॉ हळदीपूरकर यांनी केले आहेअसेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लबचे अभिनंदन करीत मीसुद्धा रोटेरिअन असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे असेही ते यावेळी म्हणाले. नेत्रदानचे महत्व समजावून सांगत त्यांनी स्वतः नेत्रदानाचा त्यांचा संकल्प यावेळी जाहीर केला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान जनजागृति पंधरवडा म्हणून देशभर साजरा केला जातो. डॉ हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट तर्फे नवीमुंबई मध्ये नेत्रदान जनजागृती विषयामध्ये स्वाक्षरी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.