स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ व २ मधील शिवसेनेकडून साजर्या करण्यात येणार्या नेरूळ सेक्टर ८ येथील एल मार्केट परिसरातील शिवसेना पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी शरद पांजरी यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे नवरात्र उत्सवाचे २७वे वर्ष असून उत्सवाच्या सचिवपदी राहूल जगदाळे यांची निवड झाली आहे.
रविवारी झालेल्या शिवसैनिकांच्या नवरात्र साजरा करण्याबाबतच्या बैठकीत यंदाच्या कार्यकारिणीची निवड झाली. उत्सवाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटणे, खजिनदारपदी मंगेश शिवतरकर, उपसचिवपदी भास्कर बागल, उपखजिनदारपदी निखिल नेटके यांची निवड करण्यात आली आहे. गेली २६ वर्षे नेरूळ पश्चिम परिसरात शिवसेनेचा नवरात्रौत्सव प्रसिध्द असून देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, तसेच दांडीया आणि गरबा खेळण्यासाठी तरूणाईदेखील या ठिकाणी उसळलेली असते.
शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, नेरूळ सेक्टर २ चे स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी, माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना महिला विभाग संघठक सौ. सत्वशीला तानाजी जाधव, महिला विभाग संघठक सौ. रेशमा वेर्गुलेकर, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, शाखाप्रमुख राजू पुजारी, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या परिश्रम घेत आहेत.
शिवसेना उपनेते विजय नाहटा, बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना पालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले, महिला जिल्हा संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक सौ. रोहिणी भोईर, , उपशहरप्रमुख गणपत शेलार, बेलापुर विधानसभा युवा सेनेचे अध्यक्ष मयुर ब्रीद यांच्यासह शिवसेना व युवा सेनेच्या सर्वच पदाधिकार्यांचे या नवरात्र उत्सवाला सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी दिली.