स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८८२०९७७७५
नवी मुंबई : विरेंद्र हरिभाऊ लगाडे हे नाव गेल्या दीड दशकापासून नेरूळ नोडमधील सामाजिक कार्यातील सुपरिचित असे नाव. शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याने विरेंद्र लगाडे यांनी आपल्या कार्याचा ठसा ठसठशीतपणे उमटवलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्याची कोणी दखल घेवून त्या कार्यकर्त्याच्या पाठिवर कोणी शाबासकीची थाप दिल्यास त्या समाजसेवकांच्या कार्याला शंभर नव्हे तर सहस्त्र हत्तींचे पाठबळ लाभते आणि पुन्हा नव्याने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आंबेडकर महोत्सव समिती, नवी मुंबई या संस्थेने विरेंद्र लगाडे या समाजसेवकाच्या कार्याची दखल घेत पाठिवर शाबासकीची थाप दिली. एक वर्ष, दोन वर्ष नव्हे तर सलग तीन वर्षे पुरस्काराने विरेंद्र लगाडे यांना पुरस्काराने सन्मानित करत सामाजिक कार्यकर्त्याच्या समाजसेवेचा खर्या अर्थाने सन्मान केला आहे.
सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेल्या दीड दशकाहून अधिक काळ विरेंद्र लगाडे सक्रियरित्या कार्यरत आहेत. बारावीपर्यतचे शिक्षण घेवून त्यानंतर विरेंद्र लगाडे यांनी इलेक्ट्रीकलचा डिपलोमा पूर्ण केला. त्यानंतर ते महाराष्ट्र सरकारचे विद्युत वितरण कंपनीचा अधिकृत व्यवसाय परवाना घेत त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केेली. साक्षी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात तर श्री. सदगुरु नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेली ८ वर्षे लगाडे हे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षापासून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही प्रवेश केला असून अनेक ठिकाणी त्यांचे गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकामही सुरू आहे.
सदगुरू पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी खासगी सावकारी मोडीत काढीत गोरगरीबांना आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांचे संसार उभे करण्याचे मोलाचे कार्य विरेंद्र लगाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र ई-कॉमचे विरेंद्र लगाडे हे आजीव सदस्य आहेत. सातत्यानेे जनसेवा करत असलेल्या विरेंद्र लगाडेंच्या सामाजिक कार्याची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आंबेडकर महोत्सव समिती, नवी मुंबई या संस्थेने घेतली. हिर्याची पारख करायला नाहीतर जोहर्याचीच गरज असते, ऐरागबाळ्याचे ते काम नसते. जोहरीची भूमिका नेमकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आंबेडकर महोत्सव समिती, नवी मुंबई या संस्थेने बजावली. २०१५ साली समाजभूषण, २०१६ साली समाजरत्न तर २०१७ साली जीवनगौरव पुरस्काराने विरेंद्र लगाडेंना सन्मानित करण्यात आले.दोनच दिवसापूर्वी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात विरेंद्र लगाडेंना जीवनगौरव हा पुररस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिध्दीपासून चार हात लांब राहत संपर्कात आलेल्याची कामे करणारे विरेंद्र लगाडेंची प्रतिमाच मुळात अजातशत्रूची आहे.