नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे धोरण आहे. यासाठी ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणेसाठी मोहिम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने दिनाक 13/09/2017 रोजी बेलापुर कार्यक्षेत्रातील सीवूड्स येथील सेक्टर-44, एस.एस. हायस्कुलमधील शाळेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी सीवुड्स बस टर्मिनल व परिसरामध्ये ओला कचरा व सुका कचरा वर्गिकरण व प्लॉस्टिक बंदी विषयी रॅली काढून जनजागृती केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वच्छता व कचरा वर्गिकरणाची शपथ घेतली तसेच परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी बेलापुर विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्रीम.प्रियंका काळसेकर, स्वच्छता अधिकारी सुभाष म्हसे, स्वच्छता निरिक्षक श्रीम. कविता खरात, पवन कोवे उप स्वच्छता निरीक्षक मिलींद तांडेल, रवींद्र चव्हाण, विजय चौधरी, शाळेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छताग्रही व नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.