नवी मुंबई : महापालिका स्थापनेपासून महापालिका कारभारावर राजकारण्यांचा वरचष्मा कायम असायचा. राजकारणी बोले आणि प्रशासन डोले असाच या शहराचा कारभार सुरू होता. परंतु महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे पर्व विराजमान झाले आणि चित्रच बदली झाले. राजकारण्यांऐवजी जनसामान्यांमध्ये आणि प्रसिध्दी माध्यमांमध्ये प्रशासनाला पर्यायाने तुकाराम मुंढेंनाच अधिक प्रसिध्दी मिळू लागली. सनदी सेवेमध्ये कार्यरत असताना ११ वर्षाच्या कालावधीत तुकाराम मुंढेंची ९ वेळा बदली होवूनही मुंढेंची कार्यप्रणाली कायम राहील्याचे पहावयास मिळाले.
तुकाराम मुंढे कामासाठी कोणत्याही शहरात गेले तरी चर्चेचा केंद्र बिंदू आणि प्रसिध्दीचा फोकस त्यांच्यावरच राहीला आहे. त्या त्या शहरातील राजकारण्यांना तुकाराम मुंढेंमुळे धडकी भरली आहे. मुंढे आणि अविश्वास ठराव हे समीकरणच बनले आहे. तुकाराम मुंढे राजकारण्यांच्या रोषास पात्र ठरत असले तरी त्या त्या भागातील सर्वसामान्यांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते.
तुकाराम मुंढे हे 2005 साली यूपीएससी परीक्षेत देशात पहिल्या 50 मध्ये आले. त्यामुळे त्यांना गृहराज्याचे केडर मिळाले. त्यांनी आपल्या मागील दहा-आकरा वर्षाच्या काळात लँड माफिया, सँड माफिया तसेच भ्रष्टाचारी राजकारण्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
गरीब व सामान्यांसाठी काम करणारे व कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) Tukaram Munde यांना मागील आठवड्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तुकाराम मुंढे सध्या पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती.
मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेतच पण समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहचल्या पाहिजेत अशी तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच आज कलेक्टर असूनही त्यांचे राहणीमान सामान्य आहे, तर मनाने संवेदनशील आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना आहे रे आणि नाही रे वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले. एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षात तब्बल 9 वेळा बदली करण्यात आली आहे.
———————————–
11 वर्षाच्या सेवेत 9 वेळा बदली-
तुकाराम मुंढे हे 2005 साली यूपीएससी परीक्षेत देशात पहिल्या 50 मध्ये आले. त्यामुळे त्यांना गृहराज्याचे केडर मिळाले. त्यांनी आपल्या मागील दहा-आकरा वर्षाच्या काळात लँड माफिया, सँड माफिया तसेच भ्रष्टाचारी राजकारण्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. सोलापूर येते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी टॅंकर लॉबीचा घोटाळा उघडवीस आणला होता. नवी मुंबई येथे असतानाही त्यांनी सध्या भ्रष्टाचाराच्या कुराण बनलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचार खाणून काढला होता. राजकारण्यांची दुकाने बंद केल्याने मुंढेंची तेथून वर्षाच्या आताच बदली केली.
*** सामान्य लोकांना हवे असतात मुंढे-
मुंढे यांचा वचक असल्याने भले भले राजकारणी व नोकरशाहीतील कंपू अधिकारी त्यांना घाबरतात. मात्र, सामान्य लोक त्यांच्या बाजूने उभे राहतात. जालना असो की सोलापूर व मध्यंतरी नवी मुंबईतून बदली झाली तेव्हा सामान्य लोक त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी आंदोलने, मोर्चे काढतात. मात्र, स्थानिक नेते वरिष्ठ पातळीवर येथून पक्ष संपवायचा आहे का असे ब्लॅकमेल करून त्यांची बदली करायला भाग पाडतात.
*** वाळू माफियांनी जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न-
तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून जास्तच दबदबा निर्माण केला. वाळू माफियांना मुंढे यांनी सळो की पळो करून सोडले. पोलिस प्रशासनातील खाबू अधिकारी काही वेळा अशा माफियांना राजकारण्याच्या दबावामुळे व लाचखोरी करून सोडून द्यायचे. मात्र, जिल्हा पोलिस प्रमुखापेक्षा जिल्हाधिकारीच हा प्रोटोकॉलनुसार प्रमुख असतो हे त्यांनी दाखवून दिले होते व आपल्या तत्वात जे बसत नाही ते करणार नाही यावर ठाम राहिले. जानेवारी 2016 मध्ये त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. मात्र, फिट अॅंड फाईन मुंढेंनी आपली सहीसलामत सुटका करून घेतली होती.
*** कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सरकारकडून गौरव-
राजकारण्यांना तुकाराम मुंढे यांची कार्यशैली व झिरो टॉलरन्स पद्धत आवडत नसली तरी सरकारी पातळीवर मात्र त्यांच्या कामाचे कौतूक होत आले आहे. 2015-2016 या वर्षात सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
*** सामान्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी वॉक वुईथ कमिशनर उपक्रम-
जनसामान्यांच्या दैनंदिन अडचणी नेमक्या काय आहेत हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांना वेळ मिळत नाही. दिवसभर ते आपल्या कामात असतात. सकाळी त्यांना 9 ला घरातून बाहेर पडावे लागते. रात्री कधी परत येणार हे माहित नसते. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुंढे यांनी नवी मुंबईत असताना वॉक वुईथ कमिशनर हा उपक्रम राबविला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असे. लोक विविध भागातून येऊन मुंढे यांच्याबरोबर चालत व आपल्या भागातील समस्या सांगत. मुंढे तत्काळ संबंधित विभाग, प्रभागातील अधिका-यांना समस्या सोडवायला सांगत त्यामुळे नागरिक त्यांच्या या पद्धतीवर खूष होत.
या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकारीवर्गासह आयुक्त प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागात जावून लोकांना भेटत. यावेळी चर्चा केल्यानुसार लोकांच्या सूचनांची दखल घेवून त्यात सुधारणा होत आहे की नाही याची माहिती घेणारी यंत्रणा त्यांनी तयार केली.
*** नवी मुंबईत असताना कचरा व्यवस्थापनावरही भरीव काम-
नवी मुंबईचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी पर्यावरणासाठी भरीव योगदान दिले. ओला व सूका कचरा वेगळा करून त्यावर लागलीच प्रक्रिया करणे, हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी व प्रदूषित पाण्यामुळे आजार होऊ नयेत म्हणून त्यांनी वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रातही आपल्या कामाची चुणूक दाखवली.