पनवेल महानगरपालिका राज्यातील नामवंत महापालिका व्हावी
लोकनेते रामशेठ ठाकूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली गतिमान प्रशासनाची अपेक्षा
महापौर उपमहापौर आणि नगरसेवक हि शोभेची पदे नसून लोकोपयोगी कामे करा
पनवेल :- पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन होऊन एकवर्ष पूर्ण केले आहे. सर्वच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तरुण आहेत. त्यामुळे गतिमानतेने काम करण्याची क्षमता पनवेल महानगरपालिकेकडे आहे. आव्हाने डोंगराएवढी असली तरी प्रत्येक क्षेत्रात महापालिकेला आघाडीवर न्हेण्यासाठी सर्वानी जोमाने कामाला लागा आणि प्रगतिशील महानगरपालिका बनवा असे प्रतिपादन लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम वर्षपूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महापौर उपमहापौर आणि नगरसेवक हि शोभेची पदे नसून लोकोपयोगी कामे करा आणि पनवेल महानगरपालिका राज्यातील नामवंत महापालिका करा असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पनवेल महानगरपालिकेचा वर्षपूर्ती सोहळा रविवारी (दिनांक १ ऑक्टोबर) साजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील,जिल्हा भाजप प्रवक्ते वाय टी देशमुख,सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीशभाई गायकवाड,महापौर डॉ कविता चौतमोल,उपमहापौर चारुशीला घरत,भाजप गटनेते परेश ठाकूर,विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या प्रथम वर्धापनदिनाचे निमित्त साधून पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाच्या कोनशिलेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. सिमरन मोटर्स तर्फे ११ लाख रुपये किमतीच्या घंटा गाड्या यावेळी महापालिकेला भेट देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणले कि, २५ वर्षे प्रलंबित राहिलेला महानगरपालिकेच्या स्थापनेचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुटला. केवळ महानगरपालिका बनवून चालणार नाही तर नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फ़त लोकोपयोगी कामे झाली पाहिजेत. तरुण महानगरपालिका असल्याचे सांगत त्यांनी गतिमान कारभाराची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.आव्हाने डोंगराएवढी असली तरी प्रत्येक क्षेत्रात महापालिकेला आघाडीवर न्हेण्यासाठी सर्वानी जोमाने कामाला लागा आणि प्रगतिशील महानगरपालिका बनवा असेही ते यावेळी म्हणाले. महापौर उपमहापौर आणि नगरसेवक हि शोभेची पदे नसून लोकोपयोगी कामे करा आणि पनवेल महानगरपालिका राज्यातील नामवंत महापालिका करा असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमात महापौर डॉ कविता चौतमोल म्हणाल्या कि,आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळेच हि महानगरपालिका अस्तित्वात अली आणि आम्हाला येथे काम करण्याची संधी भेटली. या वर्षपूर्तीनिमित्त एकत्रितपणे उत्तम काम करण्याचा संकल्प करूया आणि प्रगती करूया असे आवाहनही त्यांनी केले. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपल्या मनोगतात महानगरपालिकेला हागणदारीमुक्त महानगरपालिका हा बहुमान मिळाल्याची माहिती दिली. एकंदरीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला.
चौकट
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्र आणि राज्य सरकार देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर न्हेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता,आरोग्य,शिक्षण आणि पायाभूत सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारे चांगले काम सुरु असून आयुक्त मंत्रालयीन कामकाजाच्या अनुभवाच्या आधारे उत्तम काम करीत आहेत आणि करीत राहतील. नगरपालिकेच्या मर्यादा लक्षात घेता आणि सिडकोपेक्षा चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी महानगरपालिकेची स्थापना केलेली आहे. एकाच वेळेला सर्व सेवासुविधा देणे शक्य होणार नसले तरी नागरिकांच्या गरजांच्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रम ठरवून निकोप महानगरपालिका बनविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आहे. आमदार म्हणून जे जे शक्य असेल ते मी करण्यासाठी तयार आहे. केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी पनवेल महानगरपालिका हि चांगली,पारदर्शी,गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका बनवण्याचे ध्येय आम्हाला दिले आहे. हे आव्हान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्वीकारून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हावे.
— आमदार प्रशांत ठाकूर