सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : अचानक लादलेल्या भारनियमनाच्या विरोधात नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत आणि प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी एमएसईडीसीच्या नेरूळ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेत तात्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे.
अचानक लादलेल्या विद्युत भारनियमाच्या समस्यांबाबत विद्युत महावितरणाचे नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.एस.एस.किन्नुुर यांची रा.कॉ.पा नेरुल (प) तालुकाध्यक्ष श्री.गणेश भगत ,नेरुल प्रभाग क्रमांक-९६ च्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यानी भेट घेवुन सदर भारनियमनामुळे विभागातील गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग,व्यापारी यांची कशा प्रकारे गैरसोय होत आहे याची माहिती दिली व सदर भारनियमनाची माहिती मोबाइल मेसेज द्वारे आणि पत्रकाद्वारे नागरिकाना कलविन्याच्या सूचना केल्या. तसेच सदर भारनियमन लवकरात लवक़र बंद केले नाही तर एम.एस.ई.डी.सी विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेेसचे तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांनी यावेळी दिला.
निवेदन देताना समाजसेवक अनंत क़दम, रविंद्र भगत, सखाराम जांभळेे, विठ्ठल गांजवे उपस्थित होते.