स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ पश्चिमेकडील मनपा प्रभाग ८५ आणि ८६ मधील नागरी कामांचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात हा कार्यक्रम होत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कुकशेत गावाच्या विकासाचे शिल्पकार नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १) लोकमान्य टिळक समाज मंदिरात दिव्यांगाकरिता सुविधा पुरविणे २) कुकशेत गावातील भुखंड क्रं पी – ५ ते भुखंड क्रं. पी-१० पर्यत पदपथाची सुधारणा करणे आदी कामांचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते यावेळी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८६च्या नगरसेविका आणि महापालिकेच्या उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेरुळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटनही यावेळी महापौरांच्या हस्ते होणार आहे. या कामामध्ये उद्यानात नवीन लॉन, खेळणी, स्प्रिंक्लर्स, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि अन्य सुविधांचा समावेश राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार यांनी दिली.
सारसोळे गाव आणि कुकशेत गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरात होत असलेली विकासकामे आणि समस्यांचे निवारण हे सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि परिश्रमामुळे होत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल यांनी दिली.