स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील प्रभाग ८५ आणि ८६ मधील नागरी कामांच्या उद्घाटनाला प्रत्यक्षात वरूण राजानेही उपस्थिती लावली. स्थानिक रहीवाशांच्या लक्षणीय उपस्थितीत नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नागरी कामांचे उद्घाटन उत्साहात झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाकडून मंजूर झालेल्या १) लोकमान्य टिळक समाज मंदिरात दिव्यांगाकरिता सुविधा पुरविणे २) कुकशेत गावातील भुखंड क्रं पी ५ ते भुखंड क्रं. पी-१० पर्यत पदपथाची सुधारणा करणे आदी कामांचा शुभारंभ यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८६च्या नगरसेविका आणि महापालिकेच्या उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाकडून मंजूर झालेल्या नेरुळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटनही विभागातील महिलांच्या हस्ते झाले. या कामामध्ये उद्यानात नवीन लॉन, खेळणी, स्प्रिंक्लर्स, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत, प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका आणि महापालिका उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती सौ. जयश्री एकनाथ ठाकुर यांच्यासह भाऊ मढवी, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, पत्रकार सुजित घोलप, पत्रकार सुजित शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यशवंत तांडेल, दिपक पाटील, महादेव पवार, संजय चौधरी, स्वप्निल मेहेर, अर्जुन मढवी, गोविंद मेहेर, प्रशांत सोळसकर सौ. संजीवनी कुंभार, सुचिता पाटील, अलंका ठाकूर, मनीषा लगाडे, स्मिता म्हात्रे, भारती टाव्हरे, सिमा चौधरी, सुगंधा तळेकर, मालत दळवी, जयश्री पाटील, सुषमा पवार, प्रतिभा कोंडे, माधवी सावंत, वनिता कडू , नंदिनी चोप्रे, सुनंदा महाले, भावना भट्ट, सुकरे ताई, उषा हांडे, उज्ज्वला तांडेल, स्मिता परब, राजर्षी म्हात्रे, अक्षदा पाटील, जया कातकरी, कमळा ठाकूर, सुवर्णा मेहेर, स्वाती पाटील, सागरदीप सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम टाव्हरे यांनी केले. यावेळी वरूण राजाची उपस्थिती असतानाही हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.