स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चारमध्ये पालिका शाळेत असलेल्या नेरूळ विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात दिवसाउजेडी तसेच दुपारीदेखील डेब्रिजच्या गाड्या खाली होत असल्याने हा परिसर पालिका प्रशासनाने डेब्रिज माफियांना आंदण दिला असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर चार परिसरात स्मशानभूमीलगत अग्निशमन विभागासाठी भुखंड राखीव आहे. दोन महिन्यापूर्वी या भुखंडाची तसेच सभोवतालच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. स्थानिक रहीवाशांना लवकरच अग्निशमन विभागाचे काम सुरु होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी जेसीबी घेवून सफाई करणार्या माणसांकडून देण्यात आली. तथापि त्या भुखंडाची व लगतच्या परिसराची सफाई झाल्यावर दिवसाउजेडी, दुपारी, सांयकाळी मोठ्या प्रमाणावर डेब्रिजच्या गाड्यातून आजही डेब्रिज झाली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावरच महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय आहे. याच रस्त्यावरून महापालिका अधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या गाड्या सतत ये-जा करत असतात. तसेच विभाग अधिकारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी नगरसेवकही याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. महापालिका कर्मचारी-अधिकारी आणि नगरसेवक या डेब्रिज माफीयांकडे कानाडोळा करत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.