दिपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्नालयात तज्ज्ञ डॉक्टर आपल्या निर्धारित केलेल्या वेळेत हजर नसल्याने अनेकदा रुग्णांना तोंड द्यावे लागत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे रुग्णांना यामुळे किती अडचणी याचा प्रत्यंतर घणसोली गावातील एका वयोवृद्धाला झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा आला आहे. यामुळे तज्ज्ञ डॉक्टारावर कारवाई करण्याची मागणी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टारांना ज्या दिवसही बाह्य रुग्ण तपासणीचा दिवस असतो. त्यादिवशी २४ तास उपस्थित राहणे गरजेचे असते. परंतु हे तज्ज्ञ डॉक्टर कोणताही विचार न करता बाह्य रुग्ण तपासणी दुपारी १ वाजता संपली की घरी जाण्यास धन्यता मानत आहेत.त्यामुळे त्यांचे काम त्यांच्या हाता खाली असणार्या शिकाऊ व निवासी वैद्यकीय अधिकार्यांच्या हातात देऊन निघून जातात.त्यामुळे रात्री अपरात्री गंभीर स्वरूपाचे किंवा अपघाती रुग्ण आला तर अश्या प्रकारच्या रुग्णांना याचा भयानक त्रास होत असल्याचे वास्तव आहे.
शुक्रवारी रात्री आकाराच्या सुमारास जगन्नाथ सालेकर हे घणसोली गाव येथील साई सदानंद नगर मध्ये राहणारे ६४ वर्षीय वयोवृद्ध एपीएमसी मार्केटमध्ये काम आटोपून सायकलने कोपरी फाट्या जवळ आले असता एका अज्ञात दुचाकी स्वराने त्यांना उडवले.त्यांना गंभीर दुखापत झाल्या नंतर वर्षी येथील मनपाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे नेल्या नंतर सर्जन विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी आसिफ तांबोळी यांनी प्राथमिक उपचार केले.त्यांच्या डोक्याला, हणवटी , नाकाला,डोळ्यांना व दातांना मार लागल्यामुळे त्यांच्यावर उपचार नायक कान, मेडिसीन व दातांचे तज्ज्ञ हावे होते.तसेच सर्जन सुद्धा हावा होता.परंतु तिथे या पैकी कोणीही तज्ज्ञ डॉक्टार उपस्थित नसल्याने रुग्ण सालेकर यांना नेरूळ येथील डी.वाय.पाटील रुग्नालयात जावे लागले. यामुळे दांडी मारणार्या डॉक्टारांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांचा मुलगा प्रदीप सालेकर यांनी केली आहे.
साधारणतः तीन महिन्यापूर्वी अशीच अपघाताची घटना घणसोलीतीलच तुषार भालेकर याच्या विषयी घडली होती. तेव्हाही तुषार भालेकरला तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे मुंबईतील जे.जे.रुग्नालयात जावे लागले होते. कधी कधी तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे शिकाऊ डॉक्टर आल्यानंतर व्हाट्स अप वर रुग्णांचा फोटो काढून आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना फोटो पाठवून उपचार करत असल्याच्या घटना येथे घडत आहेत. त्यामुळे हे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या नियमित कामावर हजर का रहात नाहीत यावर चौकशी करून कणखर कारवाई करावी अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
जर रात्री अपरात्री आल्या नंतर तज्ज्ञ डॉक्टार उपलब्ध नसतील तर रुग्णालय प्रशासनाने हे जाहीर करावे जेणेकरून ह्या दवाखान्यात येण्याचे वेळ वाचे व रुग्ण दुसर्या ठिकाणी विनाविलंब नेता येईल अशी मागणी प्रदीप सालेकर यांनी केली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मनपाच्या रुग्नालयाचा दुर्लक्षितपणा समोर आला असून यावर आता आयुक्तानीच लक्ष घालावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
या बाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णालय अधीक्षकांना चौकशीचे आदेश देतो असे सांगितले.