निलेश मोरे
मुंबई : मुंबईतील विमानतळावरील कार्गो विभागात सेवा पुरवणार्या सिक्वेल वन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कामगारांना एक वर्षाचा पगारवाढ करार करण्यात आला असून एप्रिल २०१८ पासून या कंपनीमधील कामगारांना २५०० रुपये पगारवाढ करारानुसार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून कार्गो विभागात काम करणार्या १५० कामगारांनी आपल्या वेतनात पगारवाढ करार व्हावा यासाठी आपली मागणी उचलून धरली होती. भाजप प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी कामगारासह ९ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील कार्गोचे आस्थापना डायरेक्टर यांची भेट घेऊन कामगारांचे प्रश्न शिष्टमंडळासमोर मांडून कंपनीने दिवाळी पूर्वीच कामगारांची मागणी मान्य करून एप्रिल २०१८ पासून कामगारांना २५०० रुपये पगारवाढ करार करण्यात आला आहे . यावेळी संघटनेचे सरचिटणीस बलबीर नेगी, खजिनदार अभिषेक राऊत, चिटणीस दिपक कादळगावकर, पोपट बेदरकर, हाजी युनूस शाह आदी उपस्थित होते .