स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, च्या वतीने सर्व मोर्चा, प्रकोष्ठ पदाधिकारी यांच्या वतीने सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करून केरळमध्ये आयोजित असलेली जनरक्षा यात्रेबाबत जनजागृती करण्यात आली.
केरळ राज्यात साम्यवादी सरकार असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा कार्यकर्ते यांच्यावर जीवघेणे हल्ले होत असून अनेक स्वयंसेवक व कार्यकर्ते यांनी आपला जीव यात गमावला आहे. वारंवार होत असलेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी केरळमध्ये ३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २017 रोजी जनरक्षा यात्रा काढली जाणार आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई जिह्यात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्तिथ राहून निषेध व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले होते त्यास भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महिला जिल्हाध्यक्ष दुर्गाताई ढोक, जिल्हा सरचिटणीस राजेश पाटील, कृष्णा पाटील, अनुसूचित जमातीचे विकास सोरटे, नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार, जिल्हा उपाध्यक्ष संपत शेवाळे, दादा मतलापूरकर, विकास झंझाड यांच्यासह युवा, महिला,कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी दिली.