दिपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सावळागोंधळ चालूच असून गेल्या अठरा दिवसापासून महत्वाच्या व अत्यावश्यक रक्त चाचण्या होत नसल्यामुळे रुग्णांमध्ये नाराजी पसरली आहे. या रक्त चाचण्या होत नसल्यामुळे साहजिकच शस्त्रक्रिया करण्यास अडचणी येत नसल्यामुळे अनेक रुग्णांना याचा मोठा फटका बसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईका मध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात नेहमीच गरीब व गरजू रुग्णांंची गर्दी असते.येथे रक्त चाचण्यांचा मूल्य फार कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत असलेले रुग्ण येथे रक्त चाचण्या साठी येतात.परंतु लिव्हर, मूत्रपिंड,मधुमेह व इतर रक्त चाचण्या येथे होत नसल्यामुळे अनेक रुग्णांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ज्या रक्त चाचण्या गेल्या काही दिवसापासून बंद आहेत, त्या चाचण्या शस्त्रक्रिया करताना कराव्या लागतात. त्या चाचण्या करण्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत असतात. परंतु त्या चाचण्यांच आता होत नसल्यामुळे रुग्नांना खाजगी ठिकाणी जावून कराव्या लागत आहेत.परंतु ज्याची आर्थिक स्थिती चांगली असते ते करून घेतात. परंतु ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते.त्यांना मात्र थांबल्याशिवाय पर्याय नसल्याचे एक रुग्ण डी. जी. देशमुख यांनीं सांगितले.
काही रुग्ण ह्या रक्त चाचण्या नियमित करत असतात. त्यांनाही ह्या चाचण्या होत नसल्यामुळें त्यांनाही अडचणी येत असल्याचे रुग्णांचेे म्हणणे आहे. एक नागरिक डी. जी.देशमुख यांनी लिव्हर,मूत्रपिंड व मधुमेहाच्या चाचण्यांसाठी २२ सप्टेंबर रोजी केसपेपर काढला होता. परंतु त्यांच्या ह्या चाचण्या अजूनही झाल्या नसल्याने देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
या बाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांना विचारले आसता,चौकशी करतो असे सांगितले.