निलेश मोरे
मुंबई : कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे मंगळवारी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन आमदार मनीषा चौधरी, मुंबई पोर्टचे ट्रस्टी सुनील राणे आणि संघटनेचे अध्यक्ष आमदार सुधाकरराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या नावाचे बोर्डचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरचिटणीस बलबीर नेगी, उपाध्यक्ष राहुल वाळज, चिटणीस सुधांशु दीक्षित, राजा मोदी आदी उपस्थित होते.
————-
संघटनेची एकजूट घट्ट करणार – आमदार सुधाकरराव देशमुख
कामगारांच्या घामाच हित जोपासण्यासाठी आजवर अनेक राजकीयांच्या संघटना स्थापन झाल्या आहेत मात्र कामगारांचे हिताचे प्रश्न सोडवण्याऐवजी या संघटना पैशांसाठी विकल्या गेल्या. आजही कामगार स्वतंत्र भारतात उपेक्षितच आहे. मावळलेला सूर्य उगवल्या शिवाय राहत नाही आज या कामगारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना ही सूर्याचा एक तेज आहे. हा तेज कामगारांना प्रकाशात आणल्या शिवाय राहणार नाही आणि संघटनेच्या नावातली एकजूट मुट करून घट्ट करणार आणि यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या धर्तीवर पहिल्यांदाच राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे कार्यालय सुरु झाले असल्याचं आमदार अध्यक्ष सुधाकरराव देशमुख यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना केले.