दिपक देशमुख
नवी मुंबई : घणसोली परिसरातील विविध भूखंडावर आजही बिनधास्तपणे डेब्रिज टाकले जात आहे.परंतु घणसोली विभाग कार्यालयाचे अतिक्रमण विभागाचा या समस्येकडे कानाडोळा होत असल्या डेब्रिज माफियांचे काम सोपे झाले आहे.याकडे आता आयुक्तांनीच लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
घणसोली विभाग परिसरात अनेक भूखंड मोकळेच आहेत.याठिकाणी घणसोली परिसरातील अनधिकृत तसेच अधिकृत इमारती मधून निघालेला डेब्रिज टाकण्यात येत आहे. तसेच अनधिकृत इमारती जिथे बांधण्यात येत आहेत. त्याठिकाणी आधीची असलेल्या बांधकामातील डेब्रिज सुद्धा घणसोली परिसरात टाकत आहेत. त्यामुळे घणसोली परिसरात डेब्रिजचे साम्राज्य दिसून येत आहेत. विशेष म्हणजे काही सामजिक सेवेतील नागरिक घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांना संपर्क करतात परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे वात्सव आहे असेही साई लीला प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अजय पवार यांनी सांगितले.
दोन महिन्यापूर्वी सदगुरू रुग्णालयाच्या पाठीमागील वनराई मध्ये बी.एच.पाटील नाव असलेल्या ढम्पर व ट्रक बिनधास्तपणे डेब्रिज टाकण्याची माहिती अजय पवार ,विनोद जाधव ,प्रदीप शिंदे तसेच त्यांच्या मित्रांनी विभाग कार्यालयात दिली होती. परंतु त्यावर घणसोली अतिक्रमण विभागाने कारवाई केली नसल्याचे अजय पवार यांनी सांगितले. त्यामुळे यामागे मनपा अधिकार्यांच्या मनात काय आहे असा सवालही अजय पवार यांनी केला आहे. याच परिसरात सहाययक आयुक्त नागरे यांनीही एक ढम्पर पकडला होता. त्यावर नियमानुसार कारवाई न करता तुटपुंजी कारवाई करून सोडून देण्यात आले. त्याचाच परिणाम साहजिकच मनपाच्या महसुलावर होत आहे असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे अशा अधिकार्यावर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
याबाबत सहाययक आयुक्त दत्तात्रय नागरे यांना विचारले असता, आम्ही नेहमीच कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.