स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई :-एनआरबी एज्युकेशनल सोशल ऍण्ड कल्चरल ट्रस्टच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आलेे आहे.
या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव रामा भगत यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगीताचा वारसा व चालीरितीची परंपरा जोपासण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सकाळी ६ वाजता या कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तसेच नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक, शाखाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या रणरागिनी उपस्थित राहणार आहेत.
या संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमात ‘इर्र’ टिव्हीवरील गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमातील महाविजेती गायिका धनश्री देशपांडे, सारेेगामाफेम गायिका पल्लवी केळकर, अभिजित राणे, ‘गौरव महाराष्ट्रा’मधील विजेता सौरभ बखारे आदी सहभागी होत असून अनिल गावडे (ढोलक), श्रीकांत राईलकर (ऑक्टोपॅड), महेंद्र गोखले (सिंथेसायझर), मयुरेश शेरलेके (तबला), पं. गंगाधर देव आदी वादक कलाकार असणार आहेत.
या कार्यक्रमात नवी मुंबईवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून दिवाळीची सुरूवात संगीतमय वातावरणाने करावी असे आवाहन नामदेव भगत यांनी केले आहे.