स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून सानपाडा दत्त मंदिरा शेजारी त्यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाला दोन्ही बाजूला लिफ्ट बसविण्यासाठी खासदार निधीतून ५० लाखाचा निधी देण्यात आला असून त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्या वेळी शिवसेना उपनेते विजय नहाटा, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेवक एम के. मढवी, काशिनाथ पवार, माजी नगरसेवक व माजी पक्षप्रतोद रतन मांडवे, राजू पाटील, शिवसेना उप जिल्हा प्रमुख हरिभाऊ म्हात्रे, रामा मधवी, देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, स्थानिक नगरसेविका सौ. कोमल वास्कर, सोमनाथ वास्कर, विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव यांच्यासह पदाधिकारी तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार राजन विचारे यांनी खासदार झाल्या नंतर दत्तजयंतीनिमित्त त्या मंदिरामध्ये आल्यानंतर तेथील नागरिकांनी व स्थानिक नगरसेवक सोमनाथ वासकर या मंदिरा शेजारी असलेल्या पादचारी पूल धोकादायक झाल्याची माहिती निदर्शनास आणून दिल्यानंतर खा. विचारे यांनी त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त व रेल्वे प्रबंधक तसेच अधिकारी वर्ग याची याठिकाणी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला व त्यावेळी हा पूल धोकादायक झाल्याने तेथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून येत असल्याचे निदर्शनास आले. या धोकादायक झालेल्या पुलासंदर्भात मे २०१५ ला रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व महापलिका अधिकारी यांच्याकडे बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये हा पूलासाठी निधी महापलिका पुरविणार व काम रेल्वे करणार असे ठरविण्यात आले त्यावर महापालिकेस पाठपुरावा करून डिसेंबर २०१५ ला ठराव करून ४ कोटी ३४ लाखला मंजुरी मिळवली. या पुलाच्या बांधकामासाठी ५० लाख खासदार निधीही देण्यात आला होता. त्यानंतर पुलाच्या आराखड्याला मंजुरी मिळविण्यासाठी व कामाला लवकर सुरुवात करावी यासाठी रेल्वे प्रबंधक मुंबई येथे बैठका घेण्यात आल्या. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा,. अशी मागणी यावेळी करण्यात आली.