सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई : “’चंमतग’ दिवाळी अंक अत्यंत वाचनीय असून हा अंक जास्तीत जास्त मुलांपर्यत पोहोचवा”, असा ‘आदेश’ मनसेचे अध्यक्ष आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे यांनी ‘चंमतग’च्या टीमला दिला. ते कृष्णकुंज निवासस्थानी आयोजित ‘चंमतग’च्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक घडामोडी घडत असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी वेळात वेळ काढून खास छोट्यांसाठी बनवण्यात आलेल्या ‘चंमतग’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच केले. याप्रसंगी चंमतगचे प्रकाशक आणि जनविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष गजानन काळे, चंमतगचे संपादक आणि नवता बुक वर्ल्डचे संचालक कीर्तिकुमार शिंदे, चंमतगचे कार्यकारी संपादक आणि चित्रपतंगचे संस्थापक श्रीनिवास आगवणे यांसह प्राची आगवणे, नितीन चारी, आप्पासाहेब कोठुळे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, अर्जुन देवेंद्र, सागर नाईकरे आदी उपस्थित होते.
त्यानंतर नेरूळ येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्या भवन शाळेत अंकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शाळेचे विश्वस्त डॉ.किंजवडेकर सर यांच्या हस्ते चंमतग दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष एड.अक्षय काशीद जनविकास प्रबोधिनीचे सचिव संतोष गवस, चंद्रकांत उतेकर या पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील २०० विद्यार्थ्यांना चंमतग दिवाळी अंकाचे मोफत वाटप करण्यात आले.