स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला आता धुक्याचा वेढा पडू लागल्याने नवी मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. एरव्ही सकाळी सहा वाजता उजाडणार्या नवी मुंबईला सकाळचे सात वाजून गेले तरी धुक्याची झालर स्पष्टपणे पहावयास मिळाली.
बेलापुर किल्ला येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पामबीच मार्ग, पारसिक हिल, खाडी किनारा, रेल्वे रूळ यासह नवी मुंबईत ठिकठिकाणी धुक्याची झालर सोमवारी सकाळी पहावयास मिळाली. रेल्वे सेवा सकाळी संथ गतीने सुरू होती. ज्वेल ऑफ नवी मुंबई, पारसिक हिल आणि पाम बीच मार्गावर मॉर्निग वॉक करणारे गुलाबी थंडीमुळे सुखावलेले पहावयास मिळाले. एनआरआय कॉम्पलेक्स ते बेलापुर गावठाण चौक यादरम्यान पामबीच मार्गाला समांतर असणार्या रस्त्यावर मॉर्निग वॉक करणारे महिला, पुरूष धुके पाहण्यासाठी व खाडीतील मनोहारी दृश्य पाहण्यासाठी ठिकठिकाणी थांबलेले पहावयास मिळाले.