स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : खारी कळवा बेलापूर पट्ट्यातून देवाची आळंदी येथे जाणार्या वारकरी दिंड्यांचे स्वागत नवी मुंबईच्या महापौरांनी करण्याची परंपरा लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार १९९६ पासून सतत जोपासली जात आहे.
याच परंपरेनुसार नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आळंदी देवाची येथे माजी खासदार संजीव नाईक, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेविका सलुजा सुतार, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, परिवहन सदस्य राजू शिंदे, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, सुप्रसिध्द नाट्य कलावंत नंदकुमार म्हात्रे, भजन गायक जगदीश पाटील, लक्ष्मण पाटील आणि इतर मान्यवरांसह उपस्थित राहून वारकर्यांना फळे वाटप केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, नवी मुंबई (अध्यक्ष-सोपान महाराज म्हात्रे), तुकाराम महाराज वारकरी मंडळ,नवी मुंबई (अध्यक्ष-रमण महाराज पाटील), संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ,करावे (अध्यक्ष-विलास तांडेल), संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, घणसोली (अध्यक्ष-हरिश्चंद्र पाटील), संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी मंडळ, कोपरखैरणे (अध्यक्ष-कृष्णा म्हात्रे) या वारकरी मंडळाच्या वारकर्यांना फळे वितरण करण्यात येऊन पारमार्थिक आनंदोत्सव साजरा करण्यात आला.