नवी मुंबई : नागरिक-महिलांच्या सुरक्षेतेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी १५०० हून अधिक कॅमेरे बसविले जाणार आहेत. बर्याच दिवसांपासून सदर महत्वाचा प्रश्न आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागला आहे. राज्य शासनातर्फे नवी मुंबईसाठी १४९३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने तसेच सुचनेनुसार नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, तलाव, बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर, सोसायटीत जाणार्या चौकात, शासकीय कार्यालये, हॉटेल परिसर, मंडई, बाजार, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सदर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. नवी मुंबईतील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी एक विशेष बाब म्हणून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्य शासनाकडे केलेली आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने बेलापूर मतदारसंघासाठी १४९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास त्वरित मंजुरी दिली आहे.
नवी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, चेन चोरी, दरोडा, महिला वर्ग-मुली-जेष्ठ नागरिकांना या वाढत्या गुन्हेगारीचा होणार्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सदर सीसीटीव्ही कॅमेर्यांची जोडणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तालय करणार असून त्यामुळे जलद गतीने नवी मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील संवेदनशील ठिकाणावर या सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार असून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास सहाय्य होईलच; शिवाय नवी मुंबईही सुरक्षित राहण्यास मोलाचे ठरेल.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतूनही संपूर्ण बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शेकडो नवी मुंबईत १५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण १७०० पेक्षा अधिक कॅमेर्यांची नजर गुन्हेगारांवर ठेवली जाणार आहे.
दरम्यान, या व्यतिरिक्तही बेलापूर मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जेथे आवश्यकता असेल अशी ठिकाणे नागरिकांनी सुचवावीत, असे आवाहनही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.