स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : :- नवी मुंबईत वाहतुक पोलिसांकडून जोरदारपणे वाहन तपासणीची कार्यवाही सुरु झाली आहे. दोन दिवसामध्ये नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी कारवाई करताना इन्शूरन्स नसणार्या ६७ वाहनांवर जप्ती आणली असून यात ६ ट्रक, १ टेम्पो, ६० दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
नवी मुंबईतील दिघा ते बेलापुर या कार्यक्षेत्रात मुख्य रस्त्यावर, अर्ंतगत रस्त्यावर वाहतुक पोलिस वाहनांची व वाहन चालकांची कसून तपासणी करत आहेत. हेलमेट नसणे, सीटबेल्ट नसणे, सिग्नल तोडणे, अधिक वेगाने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतुक करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, दारू पिवून वाहन चालविणे, वाहन परवाना नसणे आदी दोषी असणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र गाड्यांचा इन्शूरन्स नसल्यास वाहने थेट जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. इन्शूरन्सची कागदपत्रे बनविल्याशिवाय वाहने वाहतुक पोलिसांकडून सोडण्यात येणार नाहीत.
नवी मुंबईच्या रस्त्यावर वाहतुक पोलिसांची कारवाई सुरु असून
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई आरटीओचे संजय डोळे हे स्वत: या मोहीमेची पाहणी करत आहेत. या मोहीमेमुळे वाहनांची कागदपत्रे बाळगणे, वाहतुक नियमांचे पालन करणे आदी जबाबदार्या समजण्यास वाहनचालकांना संजय डोळे आवाहन करत आहेत.