नवी मुंबई : जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडावर दरोडा टाकण्याच्या घटनेला आता दहा दिवस होत आले तरी दरोड्यातील मुख्य आरोपी गेनाप्रसाद हा अजूनही नवी मुंबई पोलिसांना सापडलेला नाही. या तपासप्रकरणी किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशात जावून पोलिसांनी अटक केली असून त्यास बुधवारी नवी मुंबईत आणले जाणार आहे.
** बॅक ऑफ बरोडा प्रकरणात आतापर्यत
१) श्रावण हेगडे
२) मोईन खान
३) हाजी अली मिर्झा बेग
४) अंजन मांझी उर्फ अंजु
५) संजय वाघ – मालेगावचा सोनार, यास दरोड्यातील सोने विकले होते.
६) मोईद्दीन शेख – यास कोलकाता हावडा येथून अटक केली
७) किशन मिश्रा – यास उत्तर प्रदेशातून अटक केली असून बुधवारी नवी मुंबईत आणले जाणार आहे.
* मुख्य आरोपी गेनाप्रसाद अजूनही फरार आहे
** दरोडेखोर अन्य राज्यात फरार झाल्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसह अन्य राज्यात पोलीसांची पथके दरोडेखोरांचा माग काढत आहेत.
** दरोड्यातील १७०० ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले असून दरोड्यासाठी वापरण्यात आलेली इर्टिका गाडी यापूर्वीच गोवंडी-बैंगनवाडी परिसरातून हस्तगत करण्यात आली आहे. लवकरच गुन्ह्याची पूर्ण उकल होणार असल्याचा विश्वास पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.