श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने कार्यान्वित क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी राज्य पातळीवर प्रतिवर्षीप्रमाणे चमकदार कामगिरी केलेली आहे. तायक्वांदो खेळ प्रकारात 14 वर्षाखालील मुलांच्या 41 किलो वजनी गटात न.मुं.म.पा.शाळा क्र. 4, सी.बी.डी. येथील साकीब जाहिदुल शेख याने शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल), 18 किलो वजनी गटात न.मुं.म.पा.शाळा क्र.36, कोपरखैरणे येथील जय तुकाराम मोरे याने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) प्राप्त केलेला असून या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.

त्याचप्रमाणे 14 वर्षाखालील मुलींच्या 20 ते 22 किलो वजनी गटात न.मुं.म.पा.शाळा क्र.4, सी.बी.डी. येथील आरती बॅरीस्टर राम हिने राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक (सिल्हर मेडल) पटकावलेला आहे. जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी विविध वजनी गटात 06 गोल्ड मेडल, 07 सिल्व्हर व 08 ब्राँझ मेडल्स पटकावलेली आहेत.
त्याचप्रमाणे 29 वी किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2017 या मध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सराव करणारे न.मुं.म.पा.शाळेतील दिपक केवट, मदन झा, रमेश बिनवाथे या खेळाडूंची ठाणे जिल्हा संघात निवड होऊन यापैकी मदन झा याची राज्य संघातून राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. अशा प्रकारे ठाणे जिल्हामधून कबड्डीमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळणारा मदन झा हा एकमेव खेळाडू आहे.
अशी चमकदार कामगिरी करणा-या गुणवंत खेळाडूंचा महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी सत्कार करुन पुढील स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणेकरिता किटसह येणारा सर्व खर्च महानगरपालिकेने करावा असे शिक्षण विभागास निर्देश दिलेले आहेत. या प्रसंगी तायक्वाँदो खेळाचे मुख्य क्रीडा मार्गदर्शक श्री सुभाष पाटील यांचा देखील आयुक्तांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश चव्हाण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे विभागप्रमुख तथा शिक्षणाधिकारी श्री संदीप संगवे तसेच क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.