दिपक देशमुख
नवी मुंबई : दिघा येथील नव्याने निर्मिती होणारे स्टेशन हे आमच्यामुळेच होत असून कोणी कितीही त्याचे श्रेय घेत आसले तरी जनतेला त्याची खरी माहिती आहे. या कामासाठी शिवसेनेनेच पाठपुरावा केला असल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचा अन्य कोणी प्रयत्न करत असल्यास आम्ही त्याचा विचार करत नसल्याचे खासदार राजन विचारे यांनी घणसोली येथे एका कार्यक्रमात सांगितले.
घणसोली येथील प्रभाग क्रमांक ३५ च्या शिवसेना नगरसेविका दिपाली सकपाळ् यांच्या प्रभागात नागरी कामांचे उदघाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते विजय नाहाटा, आरपीआय नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ, शिवेना नवी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे, मनपा गट नेते द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, माजी नगरसेवक विठ्ठल मोरे, नगरसेवक रामदास पवळे, राजू शिंदे, आयोजिका नगरसेविका दीपाली सकपाळ, शिवसेना विभाग प्रमुख सुरेश सकपाळ, उपअभियंता वसंत पडघन व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार विचारे पुढेही म्हटले की, नगरसेविका सकपाळ यांचे काम वाखाणण्याजोगे असून त्याच्या प्रभातील बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. अशा प्रकारचे कौतुक केले.
उपनेते विजय नहाटा यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर टीका केली. आमच्या खासदारांच्या निधी मधून योग्य नागरी कामे करत असून, त्यांच्या सारखे जवळच्याच माणसांची आम्ही करत नसून सर्व नागरिक एकच समजून आम्ही नागरी कामे करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या खासदारांची केलेली कामे फक्त कागदावरच होत असायची असा टोमणाही उपनेते नाहटा यांनी भाषणातून लगावला.
खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जे नागरी कामांचे उद्घाटन झाले. त्यामध्ये उद्यान,पदपथ, हरित क्षेत्र वृक्ष लागवड ,बेंच व कचरा डब्बे हे आहेत. या सर्व नागरी कामांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजने मधून दीड कोटी व २० लाख खासदार निधीचा अंतर्भाव आहे. यावेळी प्रास्तविकपर भाषणातून नगरसेविका दिपाली सकपाळ यांनी प्रभागाच्या विकासाबाबत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार राजन विचारे यांचे आभार मानले.