** दोन उडडाणपूल आणि भुयारी मार्ग मार्च-२०१८ पर्यत सुरु होणार
** आमदार संदीप नाईक यांनी केला सुविधांचा पाहणीदौरा
नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने आणि आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर पूर्णत्वाकडे जात असलेले दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग येत्या मार्च २०१८पर्यत वाहतुकीसाठी खुले होणार असून त्यामुळे ठाणे ते तुर्भे हा प्रवास आता १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी या पायाभुत सुविधांचा पाहणीदौरा करुन या कामांबाबत समाधान व्यक्त करतानाच काही उपयुक्त सुचना एमएमआरडीएच्या अधिकार्यांना केल्या. महापौर जयवंत सुतार, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे उप अभियंता जी. व्ही. राठोड, सल्लागार डी. व्ही. शेंडे, पालिकेचे अधिकारीवर्ग आदी त्यांच्यासमवेत होते.
सविता केमिकल कंपनीसमोर एक, घनसोली-तळवली येथे एक असे दोन उडडाडणूल आणि महापे येथे भुयारी मार्गाची निर्मिती सुरु आहे. ठाणे-बेलापूर मार्गाच्या कॉंक्रीटिकरणानंतर या मार्गावरील वाहतुकोंडी कमी झाली. मात्र सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावरील वाहतुक प्रचंड वाढते आणि वाहतुककोंडी होत असते. औद्यागिक भागातून या मार्गावर येताना किंवा आजूबाजूचे नोड, गावांतून या मार्गावर येताना अनेक ठिकाणी ही वाहतुककोंडी असहय होते. ही वाहतुककोंडी फोडण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेच्या माध्यमातून या मार्गावर उडडाणपूल बांधण्याचा विचार सुरु होता. मात्र हा परिसर एमएमआरडीएच्या अंतर्गत येत असल्याने लोकनेते गणेश नाईक यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात पुढाकार घेतला. एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांच्यासमवेत वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात नवी मुंबईतील विकास कामांबाबत जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीत हे उडडाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी केली. त्या अनुशंगाने आमदार संदीप नाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांसमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या. पत्रव्यवहार केला. त्यानंतर या पायाभुत सुविधांची कामे अडीच वर्षापूर्वी सुरु झाली. आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ही कामे सुरु असताना आमदार नाईक यांनी वेळोवेळी या कामांचा आढावा घेतला आहे. मंगळवारचा त्यांचा या कामांचा पाचवा पाहणीदौरा होता. एमएमआरडीएच्या अधिकार्यांना काही महत्वाच्या सुचना करताना आमदार नाईक यांनी सांगितले की. काम चांगले झाले असले तरी काही तांत्रिक अडचणींमुळे लहान-लहान त्रुटी राहतात त्यामुळे अधिकार्यांना टिकेचे धनी व्हावे लागते. तेव्हां फिनिशिंग करताना या लहान-सहान गोष्टींची काळजी घ्या. पावसाळयाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल, याची दक्षता घ्या. सविता केमिकल येथील वाहतुकीच्या अडथळयांचा मुददा उपस्थित करुन आमदार नाईक म्हणाले की, या ठिकाणी एका बाजूला दोन लेन आणि दुसर्या बाजूला तीन लेन आहेत. भविष्यातील वाहतुककोंडी लक्षात घेता या ठिकाणी आणखी एक लेन वाढवावी. तुर्भे स्टोअर येथील वाहतुककोंडीवर उपाय म्हणून आणखी एक उडडाणपूल उभारण्याची मागणी एमएमआरडीएच्या अधिकार्यांना भेटून करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. घनसोली उडडाणपूलाखालील जागेत सुशोभिकरण करता येईल काय, याविषयी महापौरांसमवेत चर्चा करणार आहे, असे ते म्हणाले. या दोन उडडाणपुलांचे आणि भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले की त्या लगतच्या सेवा रस्त्यांचे काम लगोलग करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर सुतार यांनी या प्रसंगी दिली.
दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग सुरु झाल्यावर महापे येथील एक, सविता केमिकल येथे एक आणि घनसोली-तळवली येथील तीन सिग्नलवर न थांबता वाहनचालकांना तुर्भेच्या दिशेने जाता येणार आहे. या पाचही सिग्नलवर थांबल्याने वाया जाणारा सुमारे २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
सविता केमिकल उडडाणपूल…
लांबी ५७५ मिटर
रुंदी ८.५ मिटर
लेन २
दिशा ठाणे ते बेलापूर
खर्च २४.५ करोड
घनसोली-तळवली उडडाणपूल..
लांबी १४५० मिटर
रुंदी १७ मिटर
लेन ४
खर्च ११२.२५ करोड
महापे भुयारी मार्ग…
लांबी ४८५ मिटर
रुंदी १२ मिटर
लेन ३
दिशा ठाणे-बेलापूर
खर्च १८.२५ करोड