सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये संत्र्याची आवक घटल्याने संत्री महाग दराने विकली जात आहे. मार्केटमध्ये नागपुर, पुणे, नगर भागातून संत्री विक्रीला येत असतात. सध्या बाजारात जेमतेम १५ ते १६ ट्रक भरून संत्री विक्रीला येत असल्याने संत्र्याचा भाव महागले आहे. सध्या केवळ नागपुरचीच संत्री बाजारात येत आहेत. चांगल्या दर्जाची संत्री फळ मार्केटमध्ये ७५ ते ९० रूपये डझन या भावाने विकली जात असली तरी किरकोळ बाजारात हीच संत्री १०० ते १३० रूपये डझन या भावाने विकली जात आहे. मार्केटमध्ये येणारी ८ डझनची संत्र्याची पेटी ६०० ते ७५० दराने विकली जात आहे. नंबर दोन व नंबर तीनची संत्री ३०० ते ४०० रूपये दराने विकली जात आहे. अजून एक महिना आवक कमी राहणार असल्याने महिनाभर तरी संत्री स्वस्त होणार नाहीत. एक महिन्यानंतर नगर व पुण्याची संत्री चालू झाल्यावर संत्र्याचे भाव उतरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मराठी शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेत असला तरी फळ मार्केटमध्ये किमान ९८ टक्के मुस्लिम व्यापार्यांकडे संत्री विक्रीसाठी असतात.