सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. वाढत्या आवकमुळे भाज्यांच्या दरात घसरण होवू लागली आहे. मनसेच्या आंदोलनामुळे उत्तर भारतीय फेरीवाले ग्राहक मार्केटकडे जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाले आहे. परराज्यातून भाज्यांची वाढती आवक व खरेदीदार ग्राहकांचा दुष्काळ यामुळे भाज्यांच्या दर कोसळल्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांना भाज्या व पालेभाज्या विक्रीतून गुंतवणूकही निघणे अवघड होवून बसले आहे.
गुरूवारी सकाळी वाशीतील भाजी मार्केटमध्ये ९० ट्रक आणि ४९३ टेम्पोतून भाज्यांची आवक झाली. यामध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, सुरण, भोपळा, गाजर, फ्लॉवर, वांगी, कोबी, काकडी व अन्य पालेभाज्यांचा समावेश आहे. आवक झालेल्या भाजीमालामध्ये २२८०९ क्विंटल भाज्या तर ६३९९ क्विंटल पालेभाज्या अशा एकून २९२०८ क्विंटल भाज्या मार्केटमध्ये विक्रीला आल्या.
पालेभाज्यांच्या विक्रीवर नजर टाकली असता कढीपत्ता १० ते १४ रूपये किलो, कांदापात नाशिकची १२ ते १५ रूपये जुडी, कांदापात पुणेची ४ ते ५ रूपये जुडी, कोथिंबीर नाशिकची १६ ते १८ रूपये जुडी, कोथिंबीर पुणे ५ ते ७ रूपये जुडी, मेथी नाशिकची ६ ते ७ रूपये जुडी, मेथी पुण्याची ४ ते ६ रूपये जुडी, मुळा २० ते २५ रूपये जुडी, पालक नाशिक व पुण्याची ३ ते ५ रूपये जुडी, पुदीना २ ते ४ रूपये जुडी, शापू नाशिकची जुडी ३० ते ३५ रूपये , शापू पुण्याची १० ते १२ रूपये जुडी या दराने विकली गेली.
मार्केटमध्ये भाज्यांच्या विक्रीवर नजर मारली असता, भुईमुगाच्या शेंगा ३० ते ४० रूपये किलो, लिंबू ७० पैसे ते १ रूपाया, साताराचे आले १६ ते १८ रूपये किलो तर बॅगलोरचे आले १८ ते २० रूपये किलो, अरबी १८ ते २० रूपये किलो, आवळा १० ते १२ रूपये किलो, बीट १६ ते १८ रूपये किलो, भेंडी नंबर १ ची ३२ ते ३८ रूपये किलो, भेंडी नंबर २ ची २४ ते २६ रूपये किलो, भोपळा (डांगर) ६ ते ११ रूपये किलो, भोपळा (दुधी) ८ ते १० रूपये किलो, चवळी (शेंग) २४ ते २६ रूपये किलो, ढेमसे २२ ते २६ रूपये किलो, फरसबी ४० ते ४८ रूपये किलो, फ्लॉवर ७ ते १० रूपये किलो, गाजर १२ ते १५ रूपये किलो, गवार ३५ ते ४० रूपये किलो, घेवडा १४ ते १५ रूपये किलो, काकडी नं १ ची १० ते १२ रूपये किलो, काकडी नं २ ची ६ ते ७ रूपये किलो, कारली १८ ते २० रूपये किलो, केळी (भाजी) १२ ते १६ रूपये किलो, कोबी १२ ते १४ रूपये किलो, कोहळा ८ ते १० रूपये किलो, मिरची (ढोबळी) २२ ते २४ रूपये किलो, पडवळ ७ ते ८ रूपये किलो, परवर३० ते ३६ रूपये किलो, फणस १० ते १२ रूपये किलो,रताळी १२ ते १६ रूपये किलो, शेवगा शेंग ७० ते १०० रूपये किलो, शिराळी दोडका २६ ते २८ रूपये किलो, सुरण १६ ते १७ रूपये किलो, टॉमटो नं १ चे ३५ ते ३७ रूपये किलो, टॉमटो नं २ चे १८ ते २० रूपये किलो, तोंडली कळी १३ ते १५ रूपये किलो, तोंडली जाडी ८ ते ९ रूपये किलो, वाटाणा ३० ते ३६ रूपये किलो, वालवड २० ते २४ रूपये किलो, काटेरी वांगी १० ते १२ रूपये किलो, गुलाबी वांगी ८ ते ११ रूपये किलो, काळी वांगी ८ ते १० रूपये, ज्वाला मिरची २३ ते २६ रूपये, लवंगी मिरची २४ ते २६ रूपये किलो या दराने विकली गेली.