नवी मुंबई : मागील आठवड्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये ४५ ते ४८ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा शुक्रवार सकाळपासून २६ ते ३० रूपये किलो या दराने विकला जात आहे
नगर, नाशिक, पुणे व अन्य भागातून नवीन लाल तसेच उन्हाळी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येवू लागला आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये ११० ते १२० ट्रक कांदा दररोज विक्रीसाठी येत आहे. नजीकच्याच भाजी मार्केटमध्ये तसेच भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे कांदा बटाटा विकला जातो, त्या ठिकाणीही दररोज ४ ते ५ ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. कृषीमालाला थेट विक्रीस परवानगी मिळाल्यामुळे १५ ते २० ट्रक कांदा दररोज मुंबई व मुंबईच्या उपनगरात विक्रीला जात आहे. अवकाळी पाऊसामुळे काही प्रमाणात कांदा उत्पादनाला फटका बसल्याने महिना ते दीड महिना कांदा चढ्या दराने विकला गेला. परंतु गेल्या आठ दिवसापासून कांदा विक्रीची आवक वाढू लागल्याने ४५ ते ४८ रूपये किलोने विकला जाणारा कांदा आज २६ ते ३० रूपये किलोने विकला गेला. अजून चार ते पाच दिवसांनी नव्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने कांदा १५ ते २० रूपये किलोपर्यतही येण्याची शक्यता कांदा बटाटा मार्केटचे व्यापारी व माजी संचालक अशोक वाळूंज यांनी व्यक्त केली आहे.व्यापार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.