नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ११ येथील बॅक ऑफ बरोडा शाखेवर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला होता. सोमवार, १३ नोव्हेंबरला बॅॅक उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या दरोडा प्रकरणाला आज तीन आठवडे झाले असतानाच सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. आतापर्यत पोलिसांनी याप्रकरणी ९ जणांना अटक केली होती. याशिवाय गाळा भाड्याने घेणार्या गेनाप्रसादचे मेंदूच्या आजाराने दरोडा टाकण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. अटक आरोपीतील मुख्य सूत्रधार मिर्झा बेग याने दरोडा पडल्यावर आपल्या बहीणीकडे तीन किलो सोने दिले होते. पोलिसांनी या महिलेला अटक केल्याचे उघडपणे सांगत नसले तरी तपास पथकातील खात्रीलायक सूत्रांनी मात्र त्या बहीणीला अटक करून तिच्याकडून सुमारे तीन किलोपेक्षा अधिक सोने हस्तगत केल्याचे सांगितले. यामुळे दरोडा प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली असून तपास जवळपास आता संपल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सानपाडा, सेक्टर-११ येथील बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरार
झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील आतापर्यत
१) श्रावण हेगडे
२) मोईन खान
३) हाजी अली मिर्झा बेग
४) अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत केली आहे.
५) संजय वाघ मालेगावचा सोनार, यास दरोड्यातील सोने विकले होते.
६) मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा येथून अटक केली
७) किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून अटक केली आहे
८) शुभम वर्मा यास अलाहाबाद येथून अटक केली आहे.
९) आदेश वर्मा यासही नवी मुंबई पोलिसांनी अलाहाबाद येथून अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला हाजिद अली याच्या नावावर घरफोडीचे जवळपास १०० हुन अधिक गुन्हे दाखल असून त्यानेच गत २४ नोव्हेंबर रोजी रात्री महापालिका रुग्णालयात स्वतःचे डोके आपटून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. अट्टल गुन्हेगार असलेल्या हाजीद अली याच्याकडे बँक ऑफ बडोदा लुटीतील बहुतांश सोने असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गेनाप्रसाद नसून बैंगनवाडी येथे अटक केलेला हाजी अली हाच मुख्य आरोपी असल्याचे आता उघड होवू लागले आहे. त्याने या दरोड्यासाठी तब्बल आठ लाखाची गुंतवणूक केल्याचे तपासात उघड झाले असून दरोड्यातील अधिकाधिक सोने त्याने स्वत:कडेच ठेवले होते. त्यापैकी साडे तीन किलो सोने त्याने बहीणीकडे दिल्यामुळे पोलीस या बहीणीचा शोध घेत होते.
आता मिर्झा बेगच्या बहीणीला अटक केल्यामुळे तपास जवळपास संपला असला तरी चोरलेले सोने विकण्याच्या प्रकारातून या टोळीचा छडा लागल्याचे बोलले जात आहे. बॅक दरोड्यात मिळालेले सोने विकण्यासाठी मालेगाव येथील संजय वाघ या सराफाकडे १) श्रावण हेगडे
२) मोईन खान
३) हाजी अली मिर्झा बेग
४) अंजन मांझी उर्फ अंजु गेले होते. या चारही गुन्हेगारांचा मालेगाव येथे दोन दिवस मुक्कामही होता. लुटमधील सोने काही बनावट असल्याचे वाघ या सराफाने सांगितले. उर्वरित सोन्यामध्येही सराफ आपल्याला फसवत असल्याचे मिर्झा बेगच्या निदर्शनासही आले. त्यातून त्यांचा वादही झाला. याचदरम्यान पोलिसांनी खबर्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मालेगावात जावून संजय वाघ या सराफाला अटकही केली आणि त्यातून सर्व गुन्ह्याचा तपास उलगडत गेला.
अटक आरोपीपैकी १० जणांपैकी ४ जणांना गोवंडीतून एकाला मालेगावातून तर उर्वरित ५ जणांना महाराष्ट्राबाहेरून अटक केेली आहे.