सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास त्यातून आपण जी शहरविकासाची कामे आतापर्यंत केली आहेत ती जनतेपर्यत पोहोचवा, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
नवी मुंबई : जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास त्यातून आपण जी शहरविकासाची कामे आतापर्यंत केली आहेत ती जनतेपर्यत पोहोचवा, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृह नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्ताने भरगच्च भरले होते. उभे राहूनही कार्यकर्ते लोकनेते नाईक यांचे प्रेरणादायी विचार ऐकत होते. राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवकअध्यक्ष सुरज पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख जब्बार खान, सेवादलाचे प्रमुख दिनेश पारख, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील या मान्यवरांसह राष्ट्रवादीचे विविध सेलचे प्रमुख, पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, आजी-माजी नगरसेवक, विविध समित्यांचे प्रमुख तसेच सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी केले. लोकनेते नाईक यांनी लावलेला वृक्ष आता वटवृक्ष झाला आहे, नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. येणारे दिवस आपले आहेत. कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी सांभाळून कार्य केले पाहिजे, असे मत जिल्हाध्यक्ष सुतार यांनी व्यक्त केले.
माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या कार्यकाळावर बोलताना जनतेच्या संवेदना, अडीअडचणी जाणून त्यांनी यशस्वी काम केल्याचे गौरवोदगार लोकनेते नाईक यांनी काढले. शहराचा गाडा नीट हाकण्यासाठी नगरसेवक आणि पालिका अधिकारी या घटकांमध्ये समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली. लवकरच निवडणुकीचा रणगाडा सुरु होणार आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबईकरांच्या ८० टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत. समस्या सोडविल्याचे सांगून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी विषयांत नवी मुंबई आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी असणारी नवी मुंबई पालिका एकमेव पालिका आहे. या निधीचा जनतेच्या कल्याणासाठी वापर व्हावा, अशी इच्छा बोलून दाखविली. देशात वन टाईम प्लॅनिंगची संकल्पना प्रथम मी मांडली असे नमूद करुन सीबीडीमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या धर्तीवर प्रत्येक प्रभागात वन टाईम प्लॅनिंगची कामे केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. नवी मुंबईत साकारलेल्या विकासकामांमुळेच शहराला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक मानाचे पुरस्कार मिळाल्याचे सांगत यासाठी नागरिक आणि नगरसेवकांना श्रेय दिले. ईटीसी केंद्राला मिळालेला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख त्यांनी केला. दिव्यांगांसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याची सूचना केली. मोरबे धरणामुळे नवी मुंबई जलस्वयंपूर्ण असली तरी पाण्याच्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी स्काडा प्रणाली राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या शैक्षणिक प्रगतीबददल बोलताना महापालिकेच्या माध्यमातून नर्सरी ते दहावीपर्यत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु करण्याचे संकेतही त्यांनी दिले. पालिका रुग्णालयांमधून रुग्णांना आपुलकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच स्वच्छतेसाठी पॉवर लॉन्ड्री प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून उभा करणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पातून रुग्णांना कपडे आणि इतर साहित्य दैनंदिन उपलब्ध करुन देणार आहे. छोटया सोसायटयांना जागेची अडचण असते त्यात त्यांना खतनिर्मिती प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. त्याची गरज नसून आमच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केल्याने त्यांची सक्ती केली जाणार नाही. मंत्रीपदी असताना फेरिवाले आणि जाहिरात धोरण तयार करण्यात आले होते. शासनाकडे ते पाठविले होते. त्याचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती लोकनेते नाईक यांनी दिली. रिक्षाचालक हे देखील समाजाचा एक गरजेचा भाग असून तो आपल्यातीलच एक घटक असल्याने त्यालाही सामावून घेतले पाहिजे, असे मत मांडले. आगामी लोकसभा निवडणुकांसोबतच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही होण्याची शक्यता व्यक्त करीत त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यापुढे ब्लॉक आणि प्रभाग स्तरावर बैठका घेवून कार्यकर्ते तसेच नागरिकांशी सवांद साधण्याचा कार्यक्रम जाहिर केला. पुढील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे किमान ८० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करुन येणार्या नविन वर्षासाठी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात नवनिर्वाचित महापौर जयवंत सुतार आणि माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नगरसेविका वैशाली नाईक यांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.