** राजन विचारेंची श्रेय उपटण्याची केविलवाणी धडपड
** डॉ. संजीव नाईक ह्यांच्या पाठपुराव्यामुळेच स्वतंत्र पासपोर्ट केंद्र
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळेच नवी मुंबईत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असून त्याचे श्रेय उपटण्यासाठी खासदार राजन विचारे यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर ही तीन महानगरे येतात. नवी मुंबई महानगराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. ठाण्यात असलेल्या पासपोर्ट केंद्राला नवी मुंबई बरोबर खारघर, पनवेल, उरण शहरांचा अधिक भार पेलावा लागतो आहे. नवी मुंबईमध्ये अनेक नामवंत शिक्षण संस्था, आय.टी हब, अनेक मोठ्या उद्योगांचे ऑफिसेस, व्यापारी केंद्रे आहेत. नव्याने सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पासपोर्टची मागणी वाढणार आहे. या सर्व बाबी पाहता तसेच सध्याच्या नागरिकांसाठी पासपोर्टची कामे झटपट व्हावीत यासाठी नवी मुंबईत ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ व्हावे यासाठी डॉ. संजीव नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. डॉ. नाईक यांनी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना २३ मार्च २०१७ रोजी पत्र लिहून त्यांच्याकडे नवी मुंबईत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली होती. डॉ. नाईक यांची ही मागणी मान्य करुन त्यांच्या विनंतीला परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी मान दिला. १७ जुन २०१७ रोजी परराष्ट्रमंत्री स्वराज ह्यांनी डॉ.नाईक यांना पाठविलेल्या पत्राता दुसर्या टप्प्यात नवी मुंबईत पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार आहोत, अशी माहिती दिली होती. यानंतर जाग आलेल्या खासदार राजन विचारे ह्यांनी ७ जुलै २०१७ रोजी २० दिवसांनंतर परराष्ट्रमंत्री स्वराज ह्यांची भेट घेऊन नवी मुंबईसाठी स्वतंत्र पासपोर्ट केंद सुरू करा अशी मागणी केली. त्यामुळे दुसर्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजन विचारे यांची सुरु असलेली केविलवाणी धडपड नवी मुंबईकरांमध्ये हास्याचा विषय बनली आहे.
मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात १६ केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघातील नवी मुंबई शहराचा समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या प्रयत्नाने हे स्वतंत्र पासपोर्ट केंद्र सुरु होणार आहे.
——————————————————————————————————–
आम्ही पदावर असलो की जनतेशी आमची बांधिलकी असतेच. मात्र पदावर नसलो तरी जनतेची कामे करीत आहे. ज्यांना केवळ श्रेय घ्यायचे आहे त्यांनी ते खुशाल घ्यावे. आम्ही जनतेची कामे करीतच राहणार आहे.
– डॉ. संजीव गणेश नाईक , माजी खासदार