दिपक देशमुख
नवी मुंबई : अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या आणि वाहतुकीचे नियम न पाळणार्या रिक्षा चालकांवर ‘पनवेल’च्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पनवेल मधील विविध ठिकाणी केलेल्या कारवाई सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे .
लायसन्स, बॅच सोबत न बाळगणे, रिक्षाचे भाडे नाकारणे, परमीट नसताना रिक्षा चालवणे आदिंसह विविध वाहतुकीचे नियम न पाळणार्या रिक्षा आनि मिनीडोअर चालकांवर सदर कारवाई करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १५० वाहने जप्त करण्यात आली होती. दंड भरून या वाहनांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती ‘पनवेल’च्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
दरम्यान, खारघरमधील रिक्षा चालकांनी पुकरालेल्या सुमारे २० दिवसांच्या बंदमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रवाशांच्या टिकेच्या केंद्रस्थानी होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्त्यावर उतरून अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.