सुजित शिंदे : ९६१९१९७४४
नवी मुंबई : वाशी येथील राजीव गांधी कॉलेजचा “प्रारंभ ” या महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे शनिवारी मोठया उत्साहात उदघाट्न झाले. या वेळेस खासदार हरबंश सिंग, नवी मुंबई महानगर पालिकेचे महापौर जयवंत सुतार , नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व इतर मान्यवरांच्या उपस्थित या सात दिवसीय महोत्सवाला दणक्यात सुरुवात झाली. विशेष म्हणजे “प्रारंभ ” या महोत्सवात सामाजिक बांधीलकी जपत “प्रारंभ कि कॅन्टीन” ही संकल्पना विध्यार्थी राबवित आहेत . या अंतर्गत विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले असून विक्रीचे उत्पन्न कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला देण्यात येईल. या विषयी अधिक माहिती देताना प्राचार्य वासू पांडे यांनी सांगितले कि ” प्रत्येक महाविद्यालय आपला महोत्सव साजरा करतात . परंतु आम्ही हा विचार केला कि आम्ही समाजाला यामाध्यमातून काही मदत करू शकतो का आणि “प्रारंभ कि कॅन्टीन” ही संकल्पना समोर आली. तसेच विद्यार्थीदशेतच त्यांना समाज सेवेची आवड निर्माण होईल हे ध्येय साध्य करता येईल . याच बरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या करीता त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.”
सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अडीशेच्यावर कॉलेज सहभागी असून , नऊ हजारच्या वर विद्यार्थी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेणार आहेत . तब्बल ६१ विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या महोत्सवाचे आयोजन वाशी येथील राजीव गांधी कॉलेज साईनाथ ज्युनियर कॉलेज मध्ये होत आहे. उद्घटना प्रसंगी महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या भाषणात सांगितले कि ” प्रारंभचे हे दुसरे पर्व साले तरी या मध्ये अभ्यास , नृत्य , क्रीडा , समाजहित या सर्वांची सांगड घातली गेली आहे. हा एक स्तुत्य उपक्रम असुन माझ्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा ”
तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह बघण्यास मिळाला सर्व मान्यवरांचे स्वागत ढोल ताश्याच्या गजरात करण्यात आले . विविध स्पर्धांचे आयोजन करून खेळ व स्पर्धामध्ये सहभागी प्रतियोगिताना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल . अभिनय, गायन ,नृत्य ,लघुपट ,पथनाटय , निबंध आणि कथा लेखन तसेच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, क्रिकेट , हॉली बॉल , कॅरम असे तब्बल ६१ स्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी “मिस प्रारंभ ” या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा खुल्या गटात संपन्न होईल. उदघाट्न प्रसंगी अभिनेता व बिगबॉस फेम एजाज खान , डान्स प्लस थ्री चा विजेता बीर राधा शेरपा , इंडियाज गॉट टॅलेंट चा विजेता माणिक पॉल, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सद्दाम हुसेन,चावट बॉईज , डायनामिक क्रिव, टि पी सिंग (राजीव गांधी कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी), आशाराम यादव (विश्वस्त), रमेश सिंग ( उपाध्यक्ष साईनाथ एज्युकेशन ट्रस्ट ) , उद्योजक राजेंद्र कोलकर ,समाजसेवक गिरीजा राधा सिंग, रमेश त्रिपाठी व इतर मान्यवर उपस्थित होते.