सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई मधील सर्वात मोठे असलेले सीवूड स्थानकाच्या पूर्वे बाजूच्या तिकीट घराचे उदघाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे तसेच अद्ययावतपणाचे काम वेगाने सुरू असून मार्च २०१८ मध्ये या रेल्वे स्टेशनचे लोर्कापण करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दिली. आज दुपारी ४ वाजता या तिकीट खिडकीचे उद्घाटन आज खासदार राजन विचारेंच्या हस्ते झाले. सीवूडस रेल्वे स्थानक सुरू झाल्यापासून पूर्वेच्या दिशेला तिकीट खिडकी नसल्याने पूर्वेकडील सुमारे ५० हजार लोकसंख्येला रेल्वे तिकीट व पास काढण्यासाठी पलिकडे जावे लागत होते .
यावेळी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते द्वारकानाथ भोईर, शिवसेना विभागप्रमुख संतोष मोरे, शाखाप्रमुख विशाल विचारे, समीर बागवान, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा शहर अधिकारी मयुर ब्रीद, निखिल मांडवे, सुशील सुर्वे उपस्थित होते. यावेळी खासदार राजन विचारे यांनी स्वत: ठाण्यापर्यतचे रेल्वे तिकीट काढून या तिकीट खिडकीचा कृतीतून शुभारंभ केला. खासदार राजन विचारे ठाण्याहून नवी मुंबईतील रेल्वे तिकीट खिडकीचे उद्घाटन करण्यासाठी आलेले असताना शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित असल्याने खासदारांची दखल नवी मुंबई शिवसेना फारशी गांभीर्याने घेत नसल्याची कुजबुज नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. सीवूडसला कार्यक्रम होत असताना नेरूळ, जुईनगर, सानपाडा येथील नगरसेवक व शिवसेना पदाधिकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहीले नसल्याचे पहावयास मिळाले.