सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई रिक्षा टॅक्सी चालक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भरत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील ५१ रिक्षा चालकांना चार लाख रूपयांच्या अपघाती विमा पॉलिसीचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वाहतुक सेनेेचे नवी मुंबई अध्यक्ष व शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी दिली. दिलीप आमले यांच्या पुढाकारातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई आरटीओचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या हस्ते आरटीओ कार्यालयात या रिक्षा चालकांना चार लाख रूपयांच्या अपघाती विमा पॉलिसीचे मोफत वितरण केले जाणार आहे. नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप आमले यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे नियोजन केले असून या पॉलिसीचा सर्व खर्च आमले स्वत: करणार आहेत. रस्त्यावर रिक्षा चालविणार्या रिक्षा चालकांना अपघाती विमा देवून त्यांच्या जिविताप्रती आणि त्यांच्या कुटूंबियाप्रती रिक्षा संघटनांची बांधिलकी दाखविण्याचा एक सामाजिक प्रयत्न तसेच जनजागृती करण्याचा या प्रयत्न असल्याची माहिती यावेळी दिलीप आमले यांनी दिली.