सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ठाण्याकडे ये-जा करणार्या वाहनांना ऐरोली-मुलुंडमार्गे वळविण्यात आल्याने टोलनाक्यावर वाहतुक कोंडी झाली होती. लांबवर लागलेल्या वाहनांच्या रांगा पाहून कडवट राज ठाकरेसमर्थक असलेल्या नवी मुंबई मनसेचे शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले यांनी ऐरोली टोलनाक्यावर धाव घेवून विनाटोल वाहने सोडण्यास टोलनाक्यावरील अधिकार्यांना भाग पाडले.
बेलापुर मार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे होत असलेल्या वाहतुक कोंडीला पर्याय म्हणून या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्याकडे जाणारी वाहतुक सकाळपासून ऐरोली-मुलुंडमार्गे वळविण्यात आली आहे. टोलनाक्यावर वाहनांची लांबवर रांगा लागलेल्या असताना टोलवसूलीचे काम सुरुच होते. सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले व त्यांच्या सहकार्यांनी टोलनाक्यावर जावून टोलसंबंधित अधिकार्यांना मनसे स्टाईलने चर्चेत सुनावल्यावर टोलनाक्यावरील गाड्या सांयकाळी ६.३० नंतर ऐरोली टोलनाक्यावरून विना टोल वाहने ये-जा करू लागली आहेत. जोपर्यत वाहतुक कोंडी राहील तोपर्यत टोल न स्विकारण्याचे बाणखिले यांनी टोलसंबंधित अधिकार्यांना सुनावले.
ठाणे बेलापूर रोडवर ठाणें येथे जाणारी वाहतुक विठावा येथून बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक ऐरोली टोल येथून वळवण्यात आली. त्यामुळे टोल वर लांबच लांब रांगा लागल्या असताना सुद्धा टोल वसुली केली जात असल्याचे माहीत पडताच ऐरोलीमधील महाराष्ट्र सैनिकांनी टोल वर धाव घेतली. ह्या वेळी टोल अधिकार्यांना इशारा देताच टोल बंद करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमानात पोलिस व महाराष्ट्र सैनिक जमले होते
या वेळी नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले,उपविभाग अध्यक्ष ’विश्वनाथ दळवी , प्रवीण घोगारे,चंद्रकांत महाडिक, रमेश वाघमारे, रुपेश शेवाळे, सुमित झिंजाड, प्रलय वर्हाडी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नसताना मनसेची मंडळी धडक-बेधडक जनहिताची कामे करत असतानाच ऐरोली टोलनाक्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांमध्ये रात्री उशिरापर्यत निलेश बाणखिलेंच्याच कार्याची चर्चा होत होती.