सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मनसेकडून मनपा आयुक्त, रेल्वे स्टेशन मास्तरांना राजसाहेबांचे पत्र
प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा पत्रातून इशारा
नवी मुंबई : रेल्वे प्रशासनाविरोधात पुकारलेल्या संताप मोर्च्यानंतर मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन पुकारले होते. याचे पडसाद नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर ही उमटले होते. या आंदोलनानंतर मनसेने आपला मोर्चा रेल्वे, मनपा, सिडको, पोलीस प्रशासनाकडे वळविला आहे. नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई मनपा आयुक्त श्री.एन.रामास्वामी तसेच नवी मुंबईतील सर्वच अकरा रेल्वे स्थानकातील वाशी, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली येथील रेल्वे स्टेशन मास्तरांना राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र देण्यात आले.
राजसाहेब ठाकरे यांनी ही पत्र रेल्वे मास्तर, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना उद्देशून लिहिली आहेत. या पत्रात महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या संघर्षामुळे रेल्वे स्थानके मोकळी झाल्याचा उल्लेख आहे. तसेच महाराष्ट्र सैनिकांनी जशी रेल्वे स्थानके अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवून दाखवली तशी तुम्ही देखील सहज करून दाखवू शकता, प्रश्न तुमच्या क्षमतेचा नाही तर इच्छा शक्तीचा आहे असा प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून उल्लेख आहे.
आदरणीय राजसाहेबांच्या या पत्रासोबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्थानके, मंडई तसेच शाळा, धार्मिक स्थळे, रुग्णालयांच्या १०० ते १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही या निर्णयाची न्यालायाची प्रत या निवेदनासोबत जोडली आहे. पत्राच्या सरतेशेवटी तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करायची वेळ माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर आणू नका असा इशारा देण्यात आला आहे.
मनपा आयुक्त श्री.एन.रामास्वामी यांच्याशी झालेल्या चर्चेत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विषया संदर्भात मनपाने नागरिकांसाठी टोल-फ्री तसेच व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करावा, डोमिसाईलची अट काढू नये, अनधिकृत फेरीवाल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, परवाने मराठी स्थानिकांनाच मिळावेत इत्यादी मागण्या केल्या.
याप्रसंगी या शिष्टमंडळात नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव संदीप गलुगडे, रवींद्र वालावलकर, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, आरती धुमाळ, शुभांगी बंदिचोडे, श्रीकांत माने, नितीन चव्हाण, सविनय म्हात्रे, अभिजित देसाई, विक्रांत मालुसरे, अभिलेश दंडवते, बाबाजी गोडसे, रुपेश कदम, धनंजय भोसले, विलास घोणे, प्रेम जाधव, स्वप्नील गाडगे, अप्पासाहेब कोठुळे, भगवान म्हसुरकर, विश्वनाथ दळवी, प्रवीण घोगरे, चंद्रकांत महाडिक, रमेश वाघमारे, कुमार कोळी, राजेश ढवळे, नितीन नाईक, सुहास मिंडे, अमोल इंगोले, निखील थोरात, दिनकर पागिरे, विनायक पिंगळे, विशाल भणगे, सागर नाईकरे, अर्जुन देवेंद्र, सोनाल भूतकी व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.