नवी मुंबई :- नवी मुंबईतील झोपडपट्टीचे प्रमाण मोठ्या संख्येने असल्याकारणाने तेथे नागरी सुविधा तसेच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी न.मुं.म.पा.चे आयुक्तांची भेट घेतली.
सदर नवी मुंबईतील झोपडपट्टीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असताना झोपडपट्टी वासियांना अनेक नागरी सुविधा तसेच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. तसेच नवी मुंबईतील झोपडपट्टीमध्ये ज्या सोयी-सुविधा नाही त्या त्वरित पालिकेने दिल्या पाहिजे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले व शिरवणेमध्ये जे केंद्र चालविले जाते त्या केंद्रामध्ये जे दगडखाणीत काम करणारे कामगारांचे मुलांना शिवण यंत्रणेचे प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण व शिक्षण देण्याचे काम महापालिकेने मान्य करून आयुक्तांनीही आदेश दिले आहे.
तसेच केंद्र शासनाने व राज्यशासनाने 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी वासीयांना पक्की घरे देण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत नवी मुंबईतील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात येऊन तसेच त्यांचे चांगेल राहणीमान व आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे अशी मागणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली असून ती मागणी आयुक्तांनीही मान्य केली आहे असे आमदार मंदाताई यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेने 2001 साली केलेल्या सर्वेक्षणात जवळपास 35,000 पात्र झोपडपट्टीवासियांचे फोटोपास तयार केले आहेत. परंतु आजपर्यंत त्यांना ते देण्यात आले नाहीत. सदर झोपडपट्टीवासीयांना त्यांचे फोटोपास वेळेत न मिळाल्यास त्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लवकरात लवकर नवी मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांचा पुनर्विकास करण्यात यावा व ज्या ज्या झोपडपट्टीचे सर्वेक्षण झाले आहेत त्या त्या झोपडपट्टी वासियांना त्वरित फोटोपास देण्यात यावे असेही मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजसह विजय घाटे, सुनील होनराव तसेच असंख्य स्थानिक नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते.