मुंबई येथील लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत अशा दुर्घटना घडू नये, याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची महापालिका व पोलीस आयुक्तालयाकडे मागणी
सुजित शिंदे :- ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- मुंबईतील कमला मिल मधील मोजोस पबला काल रात्री लागलेल्या आगीमुळे त्या शेजारी असलेल्या रेस्टॉरंटलाही आगीची झळ लागून त्यात १५ नागरिक मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली. सदर पबचे बांधकाम प्लास्टिक व बांबूचे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे नवी मुंबईमध्ये अशा दुर्घटना घडू नये, याकरिता खरबरदारी घेण्याबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
नवी मुंबईतील हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंट नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालयअंतर्गत असलेल्या पब, हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट आणि मनोरंजनासाठी आयोजित केल्या जाणार्या ३१ डिसेंबर या कालावधीत अनेक ठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. अशीच एक पार्टी २८ डिसेंबर रोजी मुंबईतील कमला मिल कंपाउंडमध्ये मोजोस हॉटेलमध्ये आयोजित केली होती. या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत आगीच्या धुराल्याने अडकलेल्या १५ जणांचा जागीच मृत्यू झाले व १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी ६ जणांवर के.ई.एम. रुग्णालयात तर इतर ६ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटना गंभीर बाब असून अशी दुर्दैवी घटना नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या हॉटेल व पबमध्ये घडू नये यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाने कुठली कार्यवाही केली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी शिवाय नवी मुंबईतील परवानाधारक या सर्व हॉटेल, पब, बार व मनोरंजन ठिकाणे माहिती मिळावी व अशा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेण्याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयास निवेदन दिले.