सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत नेरूळ सेक्टर सहा परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यंदाचे सप्ताहाचे हे सातवे वर्ष असून व्यसनमुक्तीसाठी राबविला जाणारा समाजप्रबोधनात्मक अखंड हरिनाम सप्ताहा अशी या सप्ताहाची ख्याती आहे. सुश्रुषा रूग्णालयानजीकच्या महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या सप्ताहामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणही केले जाणार आहे.
सिडकोचे माजी संचालक, शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख आणि शिवसेनेचे नवी मुंबई नगरसेवक नामदेव भगत यांच्या हस्ते या सप्ताहाचे कलशपुजन तर नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या हस्ते या सप्ताहाचे वीणापूजन केले जाणार आहे.
या सप्ताहामध्े सांयकाळी ४ ते ५ यादरम्यान ह.भ.प गणेश शास्त्री शेजूळ आणि ह.भ.प नामदेव महाराज मोरे यांचे प्रवचन होणार असून सांयकाळी ८ ते १० या वेळेत ह.भ.प संतदास महाराज मनसुख, ह.भ.प शामसुंदर महाराज सोनर, ह.भ.प पांडूरंग महाराज घुले यांची किर्तने होणार आहेत. 3 जानेवारी रोजी ह.भ.प दिगंबर महाराज सोनवणे यांचे काल्याचे किर्तन होणार असून सांयकाळी ४ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजप्रबोधनाला व व्यसनमुक्तीला समर्पित झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व भाविकांनी सहभागी होवून या अलौकीक ज्ञानयज्ञाचा व अविट भक्ती सुखाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्रिमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष व सप्ताहाचे आयोजक दिलीप आमले यांनी केले आहे.