नवी मुंबई : सारसोळे गावात प्रवेश करताना सुरू होणार्या बुध्या बाळ्या वैत मार्गावरील अंधार दूर होवून हा मार्ग प्रकाशमय झाला आहे. सारसोळे गावचे युवा ग्रामस्थ, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि महानगरपालिकेतील ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांच्या महापालिका प्रशासनदरबारी पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
बुध्या बाळ्या वैती मार्गावरून सारसोळेचे ग्रामस्थ तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशी ये-जा करतात. या मार्गावर असलेले पथदीव्यातून अंधूक प्रकाश येत असल्याने या ठिकाणी अंधारच असायचा. त्यामुळे रात्री अपरात्री मासेमारीसाठी जाणार्या सारसोळेच्या ग्रामस्थांना तसेच नोकरी-व्यवसायासाठी ये-जा करणार्या सेक्टर सहामधील रहीवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असे. या मार्गावरील अंधार दूर करण्यासाठी मनोज यशवंत मेहेर यांनी महापौर व आयुक्तांकडे लेखी पाठपुरावा करत या समस्येचे गांभीर्य व रहीवाशांना होत असलेला त्रास संबंधितांच्या निदर्शनास आणून दिला. मनोज मेहेर यांची मागणीमागील कळकळ व पोटतिडीक लक्षात घेता पालिका प्रशासनाने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी ‘फ्लर्ड’ लाईटची व्यवस्था केली. त्यामुळे बुध्या बाळ्या वैती मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणचा अंधार दूर झाला आहे. सारसोळेचे ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी मनोज मेहेर यांना धन्यवाद देत आहेत.
महापालिकेच्या पाचव्या सभागृहात सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील नागरी समस्या सोडविण्यासाठी, जेटी व खाडीअर्ंतगत समस्या सोडविण्यासाठी मनोज मेहेर यांनी महापालिका, सिडको व मंत्रालयीन पातळीवर तसेच जनता दरबारातही सात हजाराहून अधिक निवेदने सादर करत येथील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला होता. मनोज मेहेर हे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकवार सक्रिय झाल्याने सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील समस्या पुन्हा एकवार पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येतील, असा आशावाद सारसोळेच्या ग्रामस्थांकडून आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.