सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापालिका प्रशासन स्वच्छता सर्वेक्षणात देशामध्ये प्रथम क्रमांक यासाठी परिश्रमाची शिकस्त करत असतानाच नेरूळ सेक्टर २ मधील गृहनिर्माण सोसायटीतील अर्ंतगत भिंत रंगविणार्या बालकांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी हा आगळावेगळा सत्कार केल्याची चर्चा नेरूळ सेक्टर २ मध्ये सुरू आहे.
इंद्रधनुष्य अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन सेक्टर २ नेरूळ येथील मुलांनी स्वत:च्या कल्पकतेतून गृहनिर्माण सोसायटीतील अर्ंतगत भिंत रंगवली व भिंतीवर बोधवाक्य लिहून स्वच्छतेबाबत संदेश दिला होता. पालिका प्रशासन स्वच्छता सर्वेक्षणाबाबत आक्रमकता दाखवित असली तरी नेरूळ सेक्टर दोनमधील स्वच्छतेकडे नेहमीच कानाडोळा करत असल्याचा व येथील गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील भिंतींची रंगरंगोटी करण्यास उदासिनता दाखवित असल्याचा गंभीर आरोप भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी केला. फिफा असो वा स्वच्छता सर्वेक्षण काहीही असो महापालिकेचे स्वच्छता अभियान नेरूळ सेक्टर दोन परिसरापर्यत येतच नसल्याची नाराजी विलास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सोसायटी आवारातील भिंतीची रंगरंगोटी व प्रेरणादायी बोधवाक्ये याबाबत भाजपकडून रमेश शिवतरकर, सतीश चव्हाण, अमोल कोंडे, प्रमोद पेडणेकर, रितेश सावंत, रोहित कोदेरे आणि सोसायटीतील बालगोपाळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, कैलास जाधव उपस्थित होते. या सत्कार कार्यक्रमास भाजपचे महामंत्री अर्जुनराव चव्हाण, शशिकांत मोरे, वेदप्रकाश, सचिव सत्यम वेंर्गुलेकर, महिला मोर्चाच्या महामंत्री उज्ज्वला जगताप उपस्थित होते.
राजकीय घटक मतदानासाठी विविध कार्यक्रम राबवित असताना भाजपचे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी बालगोपाळांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.