सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाला पाटीच्या सुशोभीकरणाविषयी लेखी सूचना देवूनही महापालिका प्रशासनाकडून नियोजित वेळेत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सिवूडस भाजपच्या वतीने पाटीचे स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपात पाटी लावून या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भागात पालिका प्रशासनाच्या उदासिनतेविषयी एकीकडे संताप व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे भाजपच्या या विनयशील प्रयासाची प्रशंसा केली जात आहे.
सिवूडस सेक्टर ४६ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक पाटी तुटलेल्या अवस्थेत होती. या पाटीची डागडूजी व चौथर्याची देखभाल व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला ६ नोव्हेंबर २०१७ तसेच १५ डिसेंबर २०१७ रोजी सिवूडस भाजपने लेखी पत्रव्यवहार करून या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक याची पाटी तुटलेली असून ती नव्याने लावण्यासंदर्भात लेखी पत्र देण्याबरोबरच वारंवार ती पाटी सुस्थितीत लावण्यासाठी मनपा अधिकार्यांचीही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटही घेतली परंतु त्यांनी ती पाटी महापालिका प्रशासनाकडून सुस्थितीत लावण्यात आली नाही. पालिकेच्या या उदासिनतेमुळे भाजपा सिवूड विभागाच्या वतीने ती पाटी त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आली. परंतु पाटी लावण्यात आलेला चौथा कमकुवत असल्याने तो चौथरा कधीही तुटू शकतो.
लवकरात लवकर तो चौथरा दुरूस्त करून त्या ठिकाणी पक्क्याया स्वरूपाची पाटी तेथे लावावी अन्यथा १ महिन्यानंतर आम्ही स्वतःहून नव्याने चौथरा बांधून पक्का फलक लावून घेऊ असा इशारा भाजयुमोचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी यावेळी दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात झालेल्या छोटेखानी फलक अनावरण सोहळ्यास दत्ता घंगाळेसमवेत भाजपाचे प्रभाग क्रमांक १०८ चे अध्यक्ष सुधीर जाधव व धनगर समाजाचे बबन काळे , तानाजी सरगर, गुरुदत्त सोसायटीमधील पदाधिकारी चाळके व त्यांचे सहकारी आणि स्थानिक रहीवाशी उपस्थिर होते.