सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुदंर दिसावे ही प्रत्येकाची इच्छा आहे, मग त्याकरीता प्रत्येक नागरिकाने “आपला कचरा ही आपली जबाबदारी” समजून घरातील कचरा हा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवून तसेच सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे कचरा होणार नाही याचे भान राखले तर नवी मुंबई शहर स्वच्छतेत निश्चित देशात पहिला नंबर मिळवेल असा विश्वास नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुर्भेगांवात शैक्षणिक कार्य करणा-या डी.वाय.पाटील विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व स्वच्छता ही सवय व्हायला हवी असे आवाहन केले.

यावेळी उप महापौर मंदाकिनी म्हात्रे, नगरसेविका श्रीम. शशिकला पाटील, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त अंगाई साळुंखे आणि इतर मान्ववर उपस्थित होते.
डी.वाय.पाटील विद्यालयाच्या वतीने आयोजित या स्वच्छता अभियानात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासह पालकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याने हे अभियान सर्वार्थाने यशस्वी झाले. सर्वांनी अतिशय समरसून परिसर स्वच्छ केला.
आपण स्वच्छतेबाबत केलेले काम पाहून आपल्यालाच समाधान वाटते असे सांगत उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी प्रत्येक नागरिकाने स्वत:ला पटलेले स्वच्छतेचे महत्व आपल्या परिचयातील इतरांनीही पटवून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत केला त्याची उपस्थितांनी प्रशंसा केली. शुभांगी पाटील यांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या या स्वच्छता अभियानामुळे तुर्भेगांव व परिसरात स्वच्छतेची जागरुक चळवळ निर्माण होताना दिसत आहे.