दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमध्ये गुरूवारी रात्री शिवसेना शाखा क्रं ८७, युवा सेना बेलापुर विधानसभा कार्यालय, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांचे जनसंपर्क कार्यालय असा त्रिवेणी उद्घाटन सोहळा शिवसेनेचे बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे (काका) यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, विभागप्रमुख गणेश घाग, मिलिंद सुर्यराव, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, महिला विभागप्रमुख सौ. सत्वशीला जाधव, नगरसेवक रंगनाथ औटी, काशिनाथ पवार, विशाल ससाणे, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, विद्यार्थी सेनेचे बेलापुर संघटक व शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे, शाखाप्रमुख दिपक शिंदे, लक्ष्मण पोपळघट, दिलीप आमले, समाजसेवक प्रल्हाद पाटील, युवा सेनेचे नवी बेलापुर विधानसभा अधिकारी मयुर ब्रिद, उपविभाग अधिकारी निखिल मांडवे यांच्यासह शिवसेनेचे, महिला आघाडीचे आणि युवा सेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपर्कप्रमुख व उद्घाटक विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार यांची भाषणे झाली. विठ्ठल मोरे यांनी भगव्या शब्दावरून नवी मुंबईत निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा त्यांच्या तडाखेबंद शैलीत समाचार घेताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार जाहिर केल्याने काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची घणाघाती टीका करताना मांडवे परिवाराच्या जनसेवेचाही उल्लेख केला. शहरप्रमुख विजय माने यांनीही संपूर्ण मांडवे परिवाराने पूर्णवेळ समाजसेवेला समर्पित केले असल्याचे सांगत मांडवे परिवाराच्या जनसेवेची प्रशंसा केली. स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी आपल्या भाषणातून विकासकामांचा आढावा घेताना या शाखेच्या तसेच संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेच्या कामांना नवी उभारी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे शाखाप्रमुख लक्ष्मण पोपळघट यांनी केले.